तुम्ही फुटबॉलच्या मैदानावर एका चेंडूच्या मागे अनेक खेळाडूंना धावताना पहिले असेल, कारण तो या खेळातील एक भाग आहे. परंतु क्रिकेटच्या मैदानावर कधी एकाच चेंडूच्या मागे ४ खेळाडूंना धावताना पाहिले आहे का? नाही ना? असाच काहीसा प्रकार भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यात पाहायला मिळाला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे
गुरुवारी (२९ जुलै) भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि अंतिम टी-२० सामना पार पडला. या सामन्यात भारतीय कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो पूर्णपणे चुकीचा ठरला.
तर झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड यांनी डावाची सुरुवात केली होती. या डावातील पहिल्याच षटकात असे काही घडले, जे क्रिकेटच्या मैदानावर खूप कमी पाहायला मिळते. ऋतुराज गायकवाडने चमिराच्या चेंडूवर कव्हरच्या दिशेने अप्रतिम शॉट खेळला होता. तो चेंडू सीमाररेषेच्या दिशेने जात आहे, हे पाहून एक नव्हे तर चक्क ४-४ खेळाडू तो चेंडू अडवण्यासाठी धावले होते. या चारही खेळाडूंच्या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी या चेंडूवर भारतीय संघाला ४ धावा मिळाल्या. (Four srilankan players run after the ball, watch video)
https://twitter.com/Meri_Maa_hai_/status/1420774393077059584?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1420774393077059584%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Findia-vs-sri-lanka-3rd-t20i-4-sri-lankan-players-run-after-the-ball-80589
भारतीय संघातील फलंदाज ठरले फ्लॉप
तसेच सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न होता. परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला. भारतीय संघाला २० षटकअखेर अवघ्या ८१ धावा करण्यात यश आले. यामध्ये कुलदीप यादवने सर्वाधिक २३ धावांचे योगदान दिले.
श्रीलंका संघाचा ७ गडी राखून विजय
दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाला विजय मिळवण्याची सुवर्णसंधी होती. या संधीचा श्रीलंका संघाने दोन्ही हातांनी घट्ट पकडले. धनंजय डी सिल्वाने या सामन्यात सर्वाधिक २३ धावांची खेळी करत सामना श्रीलंका संघाला जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘भारतीय संघ आहे तो, हारेल पण माघार घेणार नाही’; पाकिस्तानातून धवनसेनेच्या धैर्याचे कौतुक
हृदय जिंकलंस! ज्यांनी टी२० मालिकेत दिला दारुण पराभवाचा धक्का, त्यांनाच ‘गब्बर’ने दिला बहुमुल्य वेळ
वयाच्या तिशीत वॉरियरच्या डोक्यावर सजली ‘पदार्पणाची कॅप’; आनंदाने झाला भावूक, फुटलं रडू