पुणे। महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना(एमसीए) यांच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या पुणे ओपन 2000 खालील फिडे रेटिंग बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या फेरीत निखिल एम, राहुल वर्मा, ऋषी कदम या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंविरुद्ध विजय मिळवत विजयी सलामी दिली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅक्सिंग हॉलमध्ये आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत भारताचा अव्वल मानांकीत निखिल एम याने ध्रुव गांधीचा 1-0 असा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताच्या आरित ठाकूरला श्रीलंकेच्या रश्मिता लियानागेकडून 0-1 अशी हार पत्करावी लागली. भारताच्या सुब्रमण्यम टी.व्ही याने रशियाच्या दिमित्री बेझस्ट्राखोवला बरोबरीत रोखले. भारताच्या श्रयन मजुमदारने सिरियाच्या अलहज्जर म्हैद याचा 1-0 असा तर, भारताच्या अनुराग जैस्वालने नमरा शाहचा पराभव केला व 1 गुण प्राप्त केले. अंकित चुडासामाने राजवीर पाटीलचा 1-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
याआधी स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धा संचालक श्री.निरंजन गोडबोले, चीफ ऑर्बिटर पॉल आरोक्यराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंकुश रक्ताडे, चंद्रकांत वळवटे, भरत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: पहिली फेरी(व्हाईट व ब्लॅक या क्रमानुसार):
निखिल एम(भारत)(1गुण) वि.वि ध्रुव गांधी(भारत)(0गुण)
आरित ठाकूर (भारत) (0गुण) पराभूत वि रश्मिता लियानगे (श्रीलंका) (1गुण)
अनुराग जयस्वाल(भारत) (1गुण) वि.वि नमरा शाह (भारत)(0गुण)
सोहम जठार (भारत) (0गुण) पराभूत वि राहुल वर्मा (भारत) (1गुण)
दिमित्री बेझस्ट्राखोव(रशिया)(½ गुण) बरोबरी वि सुब्रमण्यम टी.व्ही(भारत) (½ गुण)
वैभव जोशी (भारत) (0गुण) पराभूत वि एआयएम सूरज एम.आर(भारत) (1गुण)
ऋषी कदम (भारत) (1गुण) वि.वि अयान चेट्टियार (भारत) (0गुण)
शौर्य खाडिलकर (भारत) (0 गुण) पराभूत वि नामीत चव्हाण(भारत) (1गुण)
अंकित चुडासामा (भारत) (1गुण) वि.वि राजवीर पाटील (भारत) (0गुण)
विशाल थडानी (भारत) (0गुण) पराभूत वि कांतीलाल दवे (भारत) (1गुण)
श्रयन मजुमदार (भारत) (1गुण) वि.वि अलहज्जर म्हैद (सिरिया) (0गुण)
पार्थ पाटील (भारत) (0गुण) पराभूत वि एजीएम किरण पंडितराव (भारत) (1गुण)
हितेश एस. जरिया (भारत) (1गुण)वि.वि अक्षय जोगळेकर (भारत) (0 गुण)
अथर्व सोनी (भारत) (0गुण) पराभूत वि प्रणित कोठारी (भारत) (1गुण)
गजानन जयदे (भारत) (1गुण) वि.वि एसीएम त्रिजल शर्मा (भारत) (0गुण)
आदित्य छाजेड (भारत) (0गुण) पराभूत वि ओंकार कडव (भारत) (1गुण)
गौरव दास (भारत) (1गुण) वि.वि स्वराली कोठे (भारत) (0गुण)
अर्थ कारापूरकर (भारत) (0गुण) पराभूत वि विश्रुत पारेख (भारत) (1गुण)
विघ्नेश्वरन एस (भारत) (1गुण) वि.वि पूजा राणी (भारत) (0गुण)
इशान तेंडोलकर (भारत) (0गुण) पराभूत वि संजीव मिश्रा (भारत) (1गुण)
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटविश्वातील ‘फिनीक्स’ आहे तो!
‘तो’ म्हणाला होता, ‘माझा मृत्यू विमान अपघातात होईल आणि मी स्वर्गात जाईल’; २ वर्षांनी बरोबर तसेच घडले








