फिफाच्या क्रमवारीत फ्रान्स हा अव्वल स्थानावर विराजमान झाला. याआधी २०१८चा फिफा विश्वचषक विजेता हा संघ ६व्या स्थानावर होता. तब्बल १६ वर्षानंतर ते पहिल्या स्थानावर आले आहेत. मे २००२ला ते पहिल्या स्थानावर होते.
उपविजेता क्रोएशिया हा १६व्या स्थानावरून ४थ्या स्थानावर आला आहे. बेल्जियम दुसऱ्या तर ब्राझिल तिसऱ्या स्थानावर आहेत. बेल्जियम आणि फ्रान्स यांच्यात फक्त तीन गुणांचा फरक आहे. जुनमध्ये तयार केलेल्या नवीन नियमानुसार ही क्रमवारी काढण्यात आली आहे.
NEW #FIFARanking
🇫🇷France move 🔝
🇭🇷Croatia up to 4⃣th
🇷🇺Russia biggest climbers 📈More info ℹ️👉 https://t.co/HHIaQ9Rxrd pic.twitter.com/rU8HztDPKo
— FIFA (@FIFAcom) August 16, 2018
२०१४चा फिफा विश्वचषक विजेता जर्मनी १५व्या स्थानावर फेकला गेला आहे. तर अर्जेंटिनाची पण सहा स्थानांनी घसरण होत ११व्या स्थानावर पोहचला. तसेच उरुग्वे ५व्या, इंग्लंड ६व्या आणि पोर्तुगल ७व्या स्थानावर आहेत.
सर्वाधिक असे १५० गुणांनी पुढे जाणारा फ्रान्स या संघाचे सध्या १७२६ गुण आहेत. तर रशिया २१ स्थानांनी पुढे जात ४९व्या स्थानावर पोहचला आहे.
इजिप्त हा ७७ गुण आणि २० स्थांनानी घसरला. ही सगळ्यात मोठी घसरण ठरली आहे. पुढील क्रमवारी २० सप्टेंबर २०१८ला घोषित केली जाईल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–रियल माद्रिदला पराभूत करत अॅटलेटिको माद्रिदने पटकावले युरो सुपर लीगचे विजेतेपद
–झिदान घेऊ शकतात मॅंचेस्टर युनायटेडच्या जोस मौरिन्हो यांची जागा