टेनिस क्रमवारीत प्रथमस्थानी विराजमान असलेल्या टेनिसपटू नोवाक जोकोविच याने दोन सेट मध्ये पिछाडीवर असतांना देखील नंतर जोरदार पुनरागमन करीत इटलीचा युवा टेनिसपटू लॉरेन्जो मुसेटीचा पराभव करून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा पक्की केली. जोकोविच आता आपल्या दुसऱ्या फ्रेंच ओपन आणि कारकिर्दीच्या 16व्या ग्रँडस्लॅम किताबासाठी तयार आहे. 5 सेट पर्यंत चाललेल्या या सामन्यात झालेला हा जोकोविचचा 34वा विजय ठरला.
पहिले दोन सेट 6-7, 6-7 अशा फरकाने गमावल्यानंतर पुढील दोन सेट जोकोविचने 6-1, 6-0 असे जिंकले. आणि नंतर 5 व्या व अंतिम सेटमध्ये जेव्हा जोकोविक 4-0ने आघाडीवर होता तेव्हा 19 वर्षीय मोसेटीने मांडीचा सांधा दुखावला गेल्यामुळे सामन्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. ज्यामुळे सबिर्यन खेळाडू जोकोविच रोलंड गॅरोसवर 15व्या वेळेस उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यास यशस्वी ठरला.
नदालचा देखील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
स्पॅनिश टेनिसस्टार राफेल नदालने देखील उपउपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या जेनिक सिनेरचा पराभव केला. मागच्या फेरीत स्वीडनच्या मायकल यमरला 6-1, 7-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये हरवण्याऱ्या सिनेरने नदालला काट्याची टक्कर दिली. मात्र नदालने ब्रिटनच्या कॅमरुन नोरीला 6-3, 6-3, 6-3 असे पराभूत केले. नदालची नजर आता आपल्या करकीर्दीच्या 14व्या फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावण्याकडे असेल.
याआधी महिला एकेरीत अमेरिकेची किशोरी कोको गॉफ हिने ओन्स जेबोरला सरळ सेटमध्ये हरवून फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सोळा वर्षीय गॉफने एकतर्फी सामन्यांत जेबोरचा 6-3, 6-1 ने पराभव केला. या सामन्यादरम्यान या अमेरिकन खेळाडूने आपल्या सर्विसवर फक्त 9 अंक गमावले. तिसऱ्या सामना देखील गॉफसाठी सोपा ठरला होता. ज्यात पहिला सेट जिंकल्यावर जेनिफर ब्रेडी आपल्या पायच्या दुखण्यामुळे सामना सोडून गेली होती.
बोपण्णाच्या पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्टात
दरम्यान भारताचा अव्वल टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा क्रोएशियाचा साथीदार फ्रेंको कुगोर यांना पुरुष दुहेरीत पराभव पत्करावा लागला. त्यांना पाब्लो एंडुजार आणि पेड्रो मार्टिनेज या स्पॅनिश जोडीने 5-7, 3-6 अशा सरळ सेट्समध्ये मात दिली. बोपण्णाच्या पराभवामुळे भारताचे फ्रेंच ओपनमधील आव्हान देखील संपुष्टात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पुजारा, कोहली की विलियम्सन, WTC Finalमध्ये कोण घालणार धावांचा रतीब? दिग्गजांनी दिली उत्तरे
धोनीला संघाबाहेर करणाऱ्या माजी निवडकर्त्याने भाष्य; म्हणे, ‘दिग्गजांविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात’
तीन वर्षांपासून कोणत्याही संघाला जमले नाही ते भारतीय संघ करणार?