ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेलेल्या भारतीय संघाचा या दौऱ्यातील शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर शुक्रवारपासून(१५ जानेवारी) सुरु झाला आहे. या सामन्यावेळी एक अशी घटना घडली, ज्यामुळे उपकर्णधार रोहित शर्माला पृथ्वी शॉच्या कारणाने दुखापत होता-होता वाचली. त्यामुळे सध्या शॉ सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
झाले असे की या सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याच्या जागेवर पृथ्वी शॉ राखीव क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आला होता. त्यावेळी भारताकडून या सामन्यातून पदार्पण केलेल्या वॉशिंग्टन सुंदरच्या एका षटकातील चेंडूवर मार्नस लॅब्यूशेनने बॅकवर्ड शॉर्टलेगच्या दिशेने चेंडू मारला आणि तो एक चोरटी धाव घेण्यासाठी धावला. त्याचवेळी शॉने लॅब्यूशेनने मारलेल्या चेंडू आडवला आणि तो जोरात नॉन-स्ट्रायकर एन्डच्या दिशेने मारायता म्हणून जोरात फेकला. पण त्यावेळी तिथे मध्ये सिली मिड-ऑनला रोहित उभा होता. त्यामुळे तो चेंडू जोरात रोहितच्या हाताला लागला. काहीवेळासाठी रोहित कळवळला. मात्र, लगेचच त्याला कोणतीही गंभीर दुखापत नसल्याचे लक्षात आले.
मात्र, आधीच भारतीय संघ खेळाडूंच्या दुखापतीने हैरान असताना आणि त्यात याच सामन्यात ही घटना होण्याआधी काही वेळापूर्वीच सैनी मैदानाबाहेर गेला असल्याने चाहत्यांनी शॉ ला ट्रोल करण्यास सुरुवात केली. चाहत्यांच्या म्हणण्यानुसार आता आणखी दुखापत भारताला परवडणार नाही. काही चाहत्यांनी शॉवर विनोदी प्रतिक्रिया देखील दिली आहे. त्यांनी विनोदाने म्हटले आहे की रोहितला दुखापतग्रस्त केले, तर शॉला संघात संधी मिळेल.
शॉ याला कसोटी मालिकेतील केवळ पहिलाच सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याला संधी देण्यात आली नाही.
⚠ Friendly fire ⚠
Live #AUSvIND: https://t.co/IzttOVtrUu pic.twitter.com/8naJ3ykMe7
— cricket.com.au (@cricketcomau) January 15, 2021
Shaw trying to find a place in playing X1
— Johns. (@CricCrazyJohns) January 15, 2021
Shaw to sharma : Na khelunga, na khelne dunga😂😂
— प्रफुल्ल गमरे Prafull Gamare (@prafull_tweetz) January 15, 2021
This has already reached heights. Now even own teammates trying to injure the players
— Ashwin (@ashwin4199) January 15, 2021
Rohit be like🤣 pic.twitter.com/5oATgBA35J
— Harish (@Harish01959302) January 15, 2021
😅😅😅😅 pic.twitter.com/hICAhhBelh
— Ajita ⋰˚☆ (@ATwittyy) January 15, 2021
@ImRo45 pic.twitter.com/5D1mK0sebN
— Harsh Vasavada (@harsh83) January 15, 2021
Rohit be like… pic.twitter.com/9wkkN5qOUI
— Chinmaya Karve (@ckarve) January 15, 2021
Prithvi Shaw needs to calm a bit. 😂 pic.twitter.com/ikJM1FCCAc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 15, 2021
Rohit to Shaw : 😭😂 pic.twitter.com/u7Fh4XVHjg
— Sh@shwat10 (@ShashT10) January 15, 2021
भारताला दुखापतींचे ग्रहण –
काही दिवसांपूर्वीच सिडनी येथे पार पडलेल्या कसोटी दरम्यान अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे ते आधीच ब्रिस्बेन कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत. एवढेच नाही तर चालू ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विहारी, रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त होणारा पहिले भारतीय खेळाडू नाही. त्यांच्याआधी मोहम्मद शमी, उमेश यादव आणि केएल राहुल हे तिघेही दुखापतीमुळे या दौऱ्यातील कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहे. शमीला पहिल्या कसोटीत, उमेशला दुसऱ्या कसोटीत दुखापत झाली. तर केएल राहुलला सरावादरम्यान दुखापत झाली. तसेच ब्रिस्बेन कसोटीआधी जसप्रीत बुमराहच्या ओटीपोटात ताण आल्याने आणि आर अश्विनला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने त्यांनाही या कसोटीतून बाहेर पडावे लागले.
तसेच इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार या दौऱ्याआधीच दुखापतग्रस्त असल्याने त्यांची भारतीय संघात निवड झाली नव्हती. त्याचबरोबर रोहित शर्मा देखील दुखापतीमुळे वनडे, टी२० मालिकेत आणि कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात खेळला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता? फक्त एका चेंडूत काढल्या २८६ धावा, वाचा कधी झाला ‘हा’ अनोखा विक्रम
काय सांगता! एकाच दिवशी २ कसोटी सामने २ देशांविरुद्ध खेळणारा जगातील एकमेव संघ