---Advertisement---

लखनऊ ते दक्षिण आफ्रिका वाया कोलकाता, दुबई- कोरोनामुळे अफ्रिकेच्या संघाचा असा होणार प्रवास

On: रविवार, मार्च 15, 2020 9:09 PM
---Advertisement---

काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. मात्र या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर पुढील दोन्ही सामने कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन रद्द करण्यात आले. यानंतर आता दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा मायदेशी परतणार आहे. पण दक्षिण आफ्रिका संघ कोलकाता आणि दुबईमार्गे मायदेशी जाणार आहे.

या वनडे मालिकेतील दुसरा सामना लखनऊ येथे होणार होता. परंतू सामने रद्द करण्यात आल्याने लखनऊला पोहचलेला दक्षिण आफ्रिका संघ इथून दिल्ली किंवा मुंबईला न जाता कोलकाताला जाणार आहे. त्यानंतर दुबई मार्गे दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल.

कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेचा संघ एक दिवस रहाण्यामागील कारण असे की कोलकाता येथे अजूनतरी कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे सध्यातरी कोलकाता हे सुरक्षित ठिकाण आहे.

दक्षिण आफ्रिका संघाने कोलकाताला येण्याबद्दल बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविषेक दालमिया म्हणाले ‘दक्षिण आफ्रिकेचा संघ उद्या(सोमवारी) येथे येईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होईल. बीसीसीआय त्यांच्या रहाण्याची व्यवस्था विमानतळाजवळच करण्याचा प्रयत्न करत आहे.’

‘आम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. तसेच आम्ही सातत्याने बीसीसीआय अध्यक्षांशी(सौरव गांगुली) संपर्कात आहोत. कोलकाता सध्यातरी सुरक्षित शहरांपैकी एक आहे. त्यामुळे हा एक पर्याय होता.’

तसेच दालमिया पुढे म्हणाले, ‘आम्ही दक्षिण आफ्रिका संघास संपूर्ण सहकार्य देऊ. ते आमचे प्रतिष्ठित पाहुणे असतील. बिधाननगरचे पोलिस आयुक्त एल एन मीना वैयक्तिकरित्या व्यवस्था पाहत आहेत आणि आवश्यक ते सहकार्य देतील.’

ट्रेंडिंग घडामोडी – 

‘कॉन्फिडन्स मेरा, कब्र बनेगी तेरी’-गेलचा हिंदी डायलॉग ऐकून युवीलाही आवरले नाही हसू

“तूला आता आमचा ब्रोमान्स झेलावा लागेल”

 अखेर कॅप्टन कूल एमएस धोनीने चेन्नई सोडलीच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---