रविवारी, ५ सप्टेंबर रोजी देशभरात शिक्षक दिन साजरा केला गेला. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकाचे गुरुचे अत्यंत महत्त्व असते. मग तो व्यक्ती कोणत्याही क्षेत्राशी निगडीत असू दे. त्यांच्या आयुष्यात गुरूला एक विशेष स्थान असते. शिक्षण असो, व्यापार असो किंवा खेळ या प्रत्येक क्षेत्रात गुरु किंवा शिक्षक हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
यादरम्यान भारतीय क्रिकेटर्सने देखील या दिवसाचे औचित्य साधून आपल्या गुरुजनांची आठवण काढली. सोशल मीडियावर त्यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, दिनेश कार्तिक यांसारख्या क्रिकेटर्सने शिक्षक दिन निमित्त आपल्या गुरुजनांच्या आठवणीत काही संदेश लिहिले आहे.
सचिन तेंडुलकरने शिक्षक दिनानिमित्त आपले दिवंगत गुरू रमाकांत आचरेकर आणि मोठा भाऊ अजित तेंडुलकर यांचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या.
ज्यामध्ये सचिनने लिहिले की, “शिकणे ही एक अशी प्रक्रिया आहे, जी कधीच संपत नाही. शिक्षक दिनानिमित्त मी त्या सर्व गुरुजनांना वंदन करतो. ज्यांनी माझ्या आयुष्यात मला एक नेहमी विद्यार्थी बनून राहण्यात आणि त्यांच्याकडून नेहमी खूप शिकून घेण्यात मोलाची भूमिका बजावली. मी आचरेकर सर आणि माझा भाऊ अजित यांच्यासोबत त्या इतर अनेक लोकांचा ऋणी राहील ज्यांनी नेहमी मला शिकण्याची प्रेरणा दिली व आजही मी त्यांच्याकडून शिकत राहतो.”
Learning is a never-ending process, & on #TeachersDay, I am reminded of all my gurus who have played a key role in ensuring I remain a student forever.
Forever indebted to Achrekar Sir, my brother Ajit & several others whom I continue to learn from and learn with. pic.twitter.com/jUVB4wq83l
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 5, 2021
दिनेश कार्तिकने शिक्षक दिनाबद्दल ट्विट करत लिहिले, “असे लोक जे स्वतः महानतेची उंची प्राप्त करतात, ज्यानंतर ते त्यांच्या ज्ञानातून इतरांना देखील महान बनण्याची प्रेरणा देतात. नेहमी शिकवत राहतात. यापेक्षा चांगला पेशा दुसरा असू शकत नाही. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.”
There are people who achieve greatness and then there are people who help others become great. There can't be any profession more kind than this!
To all such Teachers, wish you a very happy teacher's day!#TeachersDay— DK (@DineshKarthik) September 5, 2021
तसेच व्हीव्हीएस लक्ष्मणने देखील आपल्या प्रशिक्षकांची आठवण काढत ट्विट केले ज्यामध्ये त्याने लिहिले, “शिकवणे म्हणजे जीवनाला कायमचे स्पर्श करणे. सेंट जॉन्स कॅम्पमधील माझे काका, माझे प्रशिक्षक आणि दिवंगत अशोक भाई यांचा मी मनापासून ऋणी आहे. मी आज जो कोणी आहे ते केवळ त्यांच्या मुळेच आहे.”
To Teach is to Touch a life Forever.
Heartfelt gratitude to my Uncle, my Coaches at St.Johns Camp and Late. Ashok Bhai for making me what I am today.#TeachersDay pic.twitter.com/6u44qrT2FU
— VVS Laxman (@VVSLaxman281) September 5, 2021
For paving the way ????
For being a constant guiding light ????
To all the Teachers in our lives ????#HappyTeachersDay ???? pic.twitter.com/JU9kHsTYei— BCCI (@BCCI) September 5, 2021
To all the wonderful people who have helped shape me, and all the circumstances that have taught me, this is a heartfelt #happyteachersday ????
— Rishabh Pant (@RishabhPant17) September 5, 2021
अशाप्रकारे अनेक भारतीय खेळाडूंनी आपल्या प्रशिक्षक गुरुजन वर्ग या सर्वांची आठवण काढत त्यांना शुभेच्छा दिल्या.
महत्वाच्या बातम्या –
–मस्ती टाइम! दुसऱ्या डावात पुजाराचा चांगला स्ट्राइक रेट पाहून रोहितने उडवली खिल्ली, पाहा व्हिडिओ
–वेलकम होम मॅगी!! जोस बटलर दुसऱ्यांदा झाला ‘बाबा’, पाहा क्यूट फोटो
–ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू, जे आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात ठरले अपयशी






