ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध टी२० लीग बिग बॅश लीग २०२१-२२ (Big Bash Legue) चा हंगाम नुकताच पार पडला. बिग बॅश लीगचे (बीबीएल) पारंपारिक प्रतिस्पर्धी पर्थ स्कॉचर्स आणि सिडनी सिक्सर्स (Perth Scotchers vs Sydeny Sixers) संघ विजेतेपदासाठीची अंतिम लढत लढण्यासाठी आमने सामने होते. पर्थ स्कॉचर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात सिडनी सिक्सर्सचा संघ १६.२ षटकांमध्ये ९२ धावांवरच सर्वबाद झाला. परिणामी पर्थ स्कॉचर्सने ७९ धावांनी हा सामना जिंकला. मात्र या सामन्यादरम्यान मैदानी पंचांनी सर्वांचे लक्ष वेधले.
त्याचे झाले असे की, नाणेफेक गमावून पर्थ स्कॉचर्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. त्याांच्याकडून शेवटच्या षटकात झाय रिचर्डसन आणि लॉरी एवान्स फलंदाजी करत होते. तर सिडनी सिक्सर्सकडून गोलंदाज द्वारशुईस हे षटक टाकत होता. या षकात एका षटकारासह पर्थ स्कॉचर्सच्या फलंदाजांनी १३ धावा जमवल्या.
व्हिडिओ पाहा- द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण
या षटकातील शेवटच्या चेंडूवर फलंदाज एवान्सने २ धावा काढण्याचा प्रयत्न केला होता आणि तो यात यशस्वीही झाला. यावेळी विरोधी सिडनी सिक्सर्सच्या खेळाडूंनी त्याला दुसरी धाव काढताना धावबाद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी यष्टीजवळ उभे असलेले पंच यष्टीपुढून दूर हटण्यासाठी मैदानावर वेगाने उलट्या दिशेने धावू लागले. दुर्देवाने धावताना त्यांचा तोल गेला आणि ते धपाक्कन मैदानावर कोसळले (Umpire Fall On Ground). अगदी पंचांनाही स्वत: आपण कसे काय खाली पडलो? हे कळाले नाही.
ते मैदानावर कोसळल्यानंतर त्वरित जागचे उठले आणि फलंदाज धावबाद होतो की नाही, हे पाहू लागले. या २-३ मिनिटांच्या मजेशीर क्षणाने सामना दर्शकांचे मात्र भरपूर मनोरंजन केले.
Umpiring is a tough job.pic.twitter.com/79b008PlKq
— Johns. (@CricCrazyJohns) January 28, 2022
असा झाला अंतिम सामना
दरम्यान मार्वल स्टेडियम येथे पार पडलेल्या या सामन्यात सिडनी सिक्सर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी अवघ्या २५ धावांमध्ये पर्थ स्कॉर्चर्सचे चार प्रमुख फलंदाज बाद केले. मात्र, त्यानंतर कर्णधार एश्टन टर्नर व लॉरी इवान्स यांनी १०४ धावांची भागीदारी रचली. दोघांनी अर्धशतके साजरी केली. टर्नर ५४ धावांवर बाद झाल्यानंतर इवान्सने नाबाद ७६ धावा करत संघाला निर्धारित २० षटकात १७१ धावांपर्यंत मजल मारून दिली.
पर्थने ठेवलेल्या १७२ धावांचा लक्षयापुढे सिडनी संघ पुरता ढेपाळला. त्यांनीही आपले आघाडीचे चार फलंदाज ६४ धावांमध्ये गमावले होते. मात्र, त्यानंतर अँड्रु टाय व झाय रिचर्डसन यांच्यापुढे उर्वरित फलंदाजांनी नांग्या टाकल्या. सिडनी संघ केवळ १६.२ षटकात ९२ धावा काढून बाद झाला. नाबाद ७६ धावांच्या खेळीसाठी लॉरी एवान्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पर्थ या विजयासह बीबीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पर्थ स्कॉर्चर्स बनले बिग बॅशचे ‘बॉस’; सिडनी सिक्सर्सला धूळ चारत पटकावले चौथे विजेतेपद
जोडी जुनीच, पण प्रेम तेच! रोहितने शेअर केला रितिकासोबतचा गोड फोटो, तुम्हीही बघतच राहाल
धक्कादायक! कोहलीच्या माजी साथीदाराला दिल्ली पोलिसांकडून जबर मारहाण, थोडक्यात वाचला डोळा
हेही पाहा-