---Advertisement---

केकेआर-सीएसकेची लढत पाहण्यासाठी चाहत्यांच्या संयमाचा तुटला बांध; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

---Advertisement---

ज्याक्षणाची गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहिली जात होती, तो क्षण अखेर आला आहे. शुक्रवारी (१५ ऑक्टोबर)आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ आमने सामने असणार आहेत. हा सामना जिंकून चेन्नई सुपर किंग्स संघाला आपले चौथे, तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला तिसरे जेतेपद आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. त्यामुळे चाहते देखील या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफच्या पहिल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने देखील क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या दोन्ही संघांनी आयपीएल २०२१ स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे या सामन्यात अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते.

हा सामना सुरू होण्यापूर्वी चाहत्यांनी सोशल मीडियावर मिम्स शेअर करायला सुरुवात केली आहे. एका युजरने प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधील जेठालाल, बबिता आणि अय्यर यांचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये डाव्या बाजूला बबिता आहे जी कोलकाताची आहे, तर उजव्या बाजूला अय्यर आहे जो चेन्नईचा आहे. तसेच त्यांनी जेठालालला जय शाह बनवले आहे. जो गुजरातचा आहे. या मिम्समध्ये त्यांनी जय शाह दोन्ही संघांना आशीर्वाद देत आहेत,असे दर्शवले आहे.

तर, दुसऱ्या एका मिम्समध्ये युजरने २०१२ मध्ये झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील अंतिम सामन्याचे चित्र दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण, २०१२ मध्ये अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजय मिळवला होता.

https://twitter.com/ThalaMa31670521/status/1448345417582743557?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1448345417582743557%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fhindi%2Fcricket%2Fipl-2021-its-csk-vs-kkr-in-finals-and-twitter-is-riding-high-on-taarak-mehta-ka-ooltah-chashmah-memes-2576225

तर, आणखी एका युजरने एक मिम्स शेअर केले आहे. ज्यामध्ये त्याने वेलकम चित्रपटातील एका डायलॉगचा फोटो शेअर केला आहे.या फोटो मध्ये परेश रावलवर चेन्नई सुपर किंग्स तर दुसऱ्या अभिनेत्यावर कोलकाता नाईट रायडर्स असे लिहण्यात आले आहे. यामधे तो अभिनेता परेश रावलला विचारतो की, “तुम्ही इथे कधी आले?” त्यावर प्रतिसाद देत परेश रावल म्हणतो, “सर्वात आधी तर मीच आलो होतो.” चेन्नई सुपर किंग्स संघाने सर्वात आधी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

 

https://twitter.com/smileandraja/status/1448668764568961031?s=20

 

चेन्नई आणि कोलकातामधील अंतिम सामना दुबईमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘अरे भावा रामनवमी नाही महानवमी,’ रिषभ पंत ‘असं’ ट्वीट केल्याने झाला ट्रोल

केकेआरला अंतिम सामन्यात डोकेदुखी ठरणार चेन्नईचे ‘हे’ पाच ‘सुपर किंग्स’

धोनीला खेळताना पाहायची शेवटची संधी? चाहत्यांनी खरेदी केली लाखोंची तिकिटे; असे आहेत दर

 

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---