‘क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे’ असे म्हटले जाते. क्रिकेटच्या मैदानावर या उक्तीचा सातत्याने प्रत्यय येत असतो. यासोबतच क्रिकेटमध्ये अशा अनेकदा अशा विचित्र घटना पाहायला मिळतात, ज्या अत्यंत मजेदार असतात. सध्या असाच एक अनोखा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक फलंदाज अगदी विचित्र पद्धतीने धावबाद होताना दिसतोय.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक फलंदाज चेंडू मारण्यासाठी जोरदारपणे बॅट फिरवत असल्याचे दिसून येते. यादरम्यान त्याच्या हातातून बॅट निसटून स्टंप्सच्या मागे पडते. दरम्यान, फलंदाज बॅट शोधण्याचा प्रयत्न करतो आणि निष्काळजीपणे बॅटच्या दिशेने चालू लागतो. दरम्यान, यष्टिरक्षक आपले प्रसंगावधान दाखवून चेंडू स्टम्पवर मारतो. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, जेव्हा चेंडू स्टंप्सवर आदळतो तेव्हा फलंदाज क्रीझच्या बाहेर असतो. त्यामुळे फलंदाजाला धावबाद दिले गेले.
Batter loses his grip on the bat. Goes to get the bat and is run out. Poor spirit of cricket from Northern? Or is this fine????? #NationalT20 https://t.co/3PY5dbWmIL
— Haroon (@hazharoon) September 4, 2022
हा व्हिडिओ पाकिस्तानच्या नॅशनल टी20 लीगचा असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे बाद झालेला फलंदाज धावांसाठी नव्हेतर त्याची बॅट शोधत असतानाच धावबाद होतो. त्यामुळे या व्हिडिओ खाली अत्यंत मजेशीर कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. तसेच काहीजण यष्टीरक्षकाचे कौतुकही करत आहेत.
क्रिकेटच्या खेळात फलंदाज दहा पद्धतीने बाद होऊ शकतो. झेलबाद, त्रिफळाचित, यष्टिचीत, पायचित व धावबाद हे बाद होण्याचे सामान्य प्रकार आहे. याशिवाय क्षेत्ररक्षणात अडथळा, हिट विकेट आणि मंकडिंगद्वारेही फलंदाजाला बाद मानले जाते. मात्र, क्रिकेटचे संचालन करणाऱ्या एमसीसीने नुकतेच मंकडिंगला धावबादच्या श्रेणीत टाकले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हार्दिकची धुलाई झाल्यावर माजी दिग्गजाला आठवला रविंद्र जडेजा, म्हणाला…
मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक टी-20 विश्वचषकात घालणार राडा! बेबी एबीची संधी हुकली
दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलाय टी-20 विश्वचषकाचा संघ, महत्वाच्या खेळाडूची कमी जाणवणार






