---Advertisement---

हसावं की रडावं! फिल्डर्सनी एकाच वेळी गमावली तीनदा रनआऊट करण्याची संधी, Video एकदा पाहाच

On: गुरूवार, जून 9, 2022 8:19 PM
European-Cricket
---Advertisement---

क्रिकेटविश्वातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये मजेशीर व्हिडिओंचे प्रमाण अधिक असते. युरोपियन क्रिकेट मालिकेतील असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये फलंदाजी करणाऱ्या खेळाडूकडून एक चेंडू नीट मारता येत नाही, पण यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे फलंदाज या चेंडूवर चांगलाच फायदा उचलतात.

हा व्हिडिओ युरोपियन क्रिकेट मालिकेतील एका सामन्याचा आहे. प्रॉग बार्बेरियन्स आणि विनोहार्डी या संघांमध्ये हा सामना खेळला गेला. हा सामना तीन षटकांचा असल्यामुळे फलंदाज धावा करण्याची एकही संधी सोडत नाही. ज्या चेंडूवर फलंदाजाला बाद केले जाऊ शकत होते, त्यावर क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे तब्बल तीन धावा खर्च झाल्या. याच प्रसंगाचा हा व्हिडिओ आहे, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. युरोपियन क्रिकेटच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.

उभय संघातील या तीन षटकांच्या सामन्यात प्रॉग बार्बेरियन्सने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी तीन षटकात दोन विकेट्स गमावल्या आणि २४ धावा उभ्या केल्या. २५ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी जेव्हा विनोहार्डी संघ मैदानात उतरला, तेव्हा त्यांना तीन षटकांमध्ये १९ धावा करता आल्या. परिणामी प्रॉग बार्बेरियन्सने सामना जिंकला.

व्हायरल झालेला व्हिडिओ-

प्रॉग बार्बेरियन्सची फलंदाजी सुरू असताना जहांनूर हक आणि एंड्र्यू सिम फलंदाजी करत होते. डावातील दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर हक स्ट्राईकवर होता आणि त्याच्याकडून चेंडू हुकला. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू गेला, पण त्याला अचूक स्टंपिंग करता आली नाही आणि चेंडू गोलंदाजाच्या दिशेने गेला. त्यानंतर गोलंदाज चेंडू पकडतो आणि पुन्हा स्टंप्सवर मारतो. गोलंदाजाला देखील तो चेंडू स्टंप्सवर मारता येत नाही आणि फलंदाज यादरम्यान एक धाव पूर्ण करतात. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून ही चूक एकदा नाही, तर तब्बल तीन वेळा होते. परिणामी फलंदाज तीन धावा घेतात. पुढे याच धावा त्यांना सामना जिंकण्यासाठी खूप महत्वाच्या ठरतात.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

दीडशेहून अधिक वेगाने बॉलिंग करणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजावरील बॅन हटला, ‘या’ कारणामुळे आणली होती बंदी

‘मी ही जागा कुठेतरी पाहिलीये’, दिनेश कार्तिकच्या पुनरागमनावर माजी दिग्गजाची प्रतिक्रिया व्हायरल

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उमरान मलिक पदार्पण करणार? कर्णधार रिषभ पंतने दिले संकेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---