---Advertisement---

गॅलॅक्टिकचे सहा गोल, तर संघवी एफसीची बरोबरी

On: मंगळवार, मे 24, 2022 9:43 AM
Football
---Advertisement---

पुणे। गॅलॅक्टिक वॉरियर्सने आज पीडीएफए फुटबॉल लीगमध्ये तृतिय श्रेणीत विजयी सातत्य कायम राखताना सहा गोल केले. त्याचवेळी संघवी एफसीला बरोबरीवर समाधान मानावे लागले, तर आर्यन्स एससी ब संघाला विजयासाठी झगडावे लागले.

स्पर्धेत आज सोमवारी सप महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात संघवी एफसी ब संघाला हायलॅंडर्स एफसीने १-१ असे बरोबरीत रोखले. अ गटातील या साम्नयात राजेंद्र राक्षे याने संघवी एफसीसाठी ३६व्या, तर कौस्तुभ शिंदेने ५५व्या मिनिटाला हायलॅंडर्सला बरोबरी साधून दिली.

त्यानंतर झालेल्या सामन्यात गॅलॅक्टिक वॉरियर्सने एफसी बेकडिन्हो ब संघांविरुद्ध विजय नोंदवतना अर्धाडझन गोल केले. अ गटातीलच या सामन्यात प्रतिक होसमणी आणि श्रेयस शेवटे यांनी प्रत्येकी दोन, अरिफ शेख, आयन सय्यद यांनी एकेक गोल करून संघाचा विजय साकार केला.

ब गटातील सामन्यात आर्यन्स एससी ब संघाने मोमिनपुराचा प्रतिकार २-१ असा परतवून लावला. गौरव नदारने ३४, तर केवल वैतीने ४४व्या मिनिटाला विजयी संघासाठी गोल केले. मोमिनपुरासाठी एकमात्र गोल हम्माद शेख याने ४२व्या मिनिटाला केला.

निकाल –
सप महाविद्यालय मैदान – तृतिय श्रेणी –
गट अ – हायलॅंडर्स एफसी १ (कौस्तुभ शिंदे ५५वे मिनिट) बरोबरी वि. संघवी एफसी बी १ (राजेंद्र राक्षे ३६वे मिनिट)
गॅलॅक्टिक वॉरियर्स ६ (अरिफ शेख १४वे मिनिट, आयन सय्यद १८वे मिनिट, प्रतिक होसमणी २रे आणि ६वे मिनिट, श्रेयस शेवते २३ आणि ५५ने मिनिट) वि.वि. एफसी बेकडिन्हो ब ०

गट ब – आर्यन्स एससी ब २ (गोरव नदार ३४वे, केवल वैती ४४वे मिनिट) वि.वि. मोमिनपुरा १ (हम्माद शेख ४२वे मिनिट)
व्होबा पुढे चाल वि. परदेशी एफसी

गट एच – भारतीय एफसी ३ (जारेड खिरम २३वे मिनिट, संदिप बारो २७वे, जयेश सिंग ६०वे मिनिट) वि.वि. रेयाल पुणे १ (अविनाश पांडव ५८वे मिनिट)

महत्त्वाच्या बातम्या – 

एमएसएलटीए सुहाना स्मार्ट टेनिस सर्किट स्पर्धेत मुंबईच्या तमन्ना नायर, आरव छल्लाणी यांना विजेतेपद

डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज: ध्रुवा माने, आर्या शिंदे, पियुश जाधव, आशुतोष कवडेकर यांचे मानांकित खेळाडूंवर विजय

वनप्लस करंडक चॅम्पियनशीप सिरीज: चार मानांकित खेळाडू पराभूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---