भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी बुधवारी (७ जुलै) आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीला जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमी व खेळाडू वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र, त्याचवेळी भारताचा माजी सलामीवीर व संघसहकारी गौतम गंभीर हा अचानकपणे चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.
गंभीरला जावे लागत आहे ट्रोलिंगला सामोरे
भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा सातत्याने धोनीविषयी नकारात्मक वक्तव्ये करताना दिसत असतो. त्या कारणाने अनेक वेळा क्रिकेटप्रेमी त्याला निशाण्यावर ठरतात. धोनीच्या वाढदिवशी गंभीरने त्याला शुभेच्छा दिल्या नाहीत. मात्र, आपल्या फेसबुक हेडरवर २०११ विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील एक छायाचित्र पोस्ट केले आहे. ज्यामध्ये तो अर्धशतक झाल्यानंतर बॅट उंचावताना दिसतोय.
या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत गंभीरने ९७ धावांची खेळी केली होती. त्याचवेळी धोनीने ९१ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात सामनावीर म्हणून धोनीची निवड करण्यात आली. त्यामुळे अनेकदा गंभीरचे यश धोनीमुळे झाकोळले गेल्याचा आरोप केला जातो.
चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
गंभीरने फेसबुक हेडरवर ते छायाचित्र पोस्ट केल्यानंतर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या. एका चाहत्याने यावर उत्तर देताना लिहिले,
‘ती एक सर्वोत्तम खेळी होती. मात्र, हे छायाचित्र पोस्ट करण्याचा आजचा दिवस नव्हता.’ दुसऱ्या एका चाहत्याने उत्तर देताना म्हटले,
‘हे छायाचित्र आज का पोस्ट केले हे सर्वांना माहीत आहे. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तू काही गमावले नसते.’ कारण एका चाहत्याने त्याला जळकुकडा व वैफल्यग्रस्त असेदेखील म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेट जगतातून दिलिप कुमार यांना श्रद्धांजली; विराट, सचिनसह या खेळाडूंचे भावनिक ट्विट
जीवनातील या ८ महत्त्वाच्या गोष्टी, ज्या धोनीकडून आहेत शिकण्यासारख्या
असे ५ गोलंदाज, ज्यांनी धोनीला करु दिल्या नाहीत शेवटच्या ओव्हरमध्ये धावा