दक्षिण अफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन (gary kirsten) आता इंग्लंडच्या कसोटी संघाला (england test team) प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक आहेत. कर्स्टन यांनी त्यांच्या प्रशिक्षकाच्या कार्यकाळात अशी काही कामे केली आहेत, जी प्रत्येकाच्या लक्षात आहेत. कर्स्टन यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक देखील जिंकला होता. इंग्लंड संघाचे कसोटी क्रिकेटमधील मागच्या काही काळापासूनचे प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. अशात कर्स्टन यांनी अडचणीत असलेल्या इंग्लंड संघाला प्रशिक्षण देण्याची इच्छा व्यक्त केली.
सन २०११ विश्वचषकादरम्यान कर्स्टन भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते आणि त्यावर्षी भारताने विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर त्यांनी २०१३ मध्ये दक्षिण अफ्रिका संघाला प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी एकाही आंतरराष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले नव्हते. परंतु यादरम्यान आयपीएलमध्ये आणि बिग बॅश लीगमध्ये त्यांनी प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली. कर्स्टन यांची एकंदरित कारकीर्द पाहून असे म्हटले जाऊ शकते की, त्यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा चांगला अनुभव आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार कर्स्टन म्हटले की, ‘इंग्लंडसोबत काम करण्याचा नेहमीच विचार होता, कारण ही एक सन्मानाची गोष्ट आहे. परंतु सर्व प्रकारांमध्ये प्रशिक्षक बनण्याचा विचार कधीच केला नाही. मी हा प्रवास दोन वेळा केला आहे, त्यामुळे मी निर्णय घेतला आहे की, सर्व प्रकारांसाठी आता काम करणार नाही. कसोटी संघ आणि एकदिवसीय संघासोबत काम करण्याची इच्छा आहे. इंग्लंडचा एकदिवसीय संघ सर्वोत्तम आहे. तुम्ही ज्या खेळाडूंना निवडले आहे, त्यांच्यात निरंतरता आहे. कसोटी संघाने मागच्या काही काळापासून संघर्ष केला आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे चांगला अनुभव असेल.’
इंग्लंडच्या मागच्या काही काळातील प्रदर्शनचा विचार केला, तर त्यांनी भारताविरुद्ध मायदेशातील दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या ऍशेस मालिकेत देखील इंग्लंडने निराशाजनक प्रदर्शन केले आहे. ऍशेस मालिकेतील पहिल्या तीन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असून ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, कर्स्टन यांनी यापूर्वी देखील इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता, पण त्यावेळी त्यांची नियुक्ती झाली नव्हती. इंग्लंड संघाचे सततचे खराब प्रदर्शन पाहता संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षकपदाविषयी काही मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
आता तयारी मालिकेत विजयी आघाडीची! दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाचा जोरदार सराव, पाहा व्हिडिओ
‘विराटला टी२० कर्णधारपद सोडू नको, असं सांगण्यात आले होते’, निवड समीती प्रमुखांकडून स्पष्टीकरण
व्हिडिओ पाहा –