दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आता न्यूझीलंड संघाला भारताचा दौरा करायचा आहे. १७ नोव्हेंबरपासून हा दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्याबाबत न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी एक चिंताजनक मत व्यक्त केले आहे. आयसीसी टी-२० विश्वचषकानंतर लगेचच भारताविरुद्धची मालिका न्यूझीलंड क्रिकेटपटूंसाठी मानसिकदृष्ट्या खूप जड असेल.
एका वाहिनीशी बोलताना, गॅरी स्टीड यांनी खुलासा केला की, ‘कसोटी खेळणारे न्यूझीलंड संघातील खेळाडू आधीच भारतातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहेत. जी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंड संघाची पहिली मालिका असेल. मला आठवते की, टी-२० विश्वचषकानंतर लगेचच दुसरी मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे नक्कीच अवघड आणि आव्हानात्मक आहे.’
गॅरी स्टीड पुढे म्हणाले, ‘आमच्या संघातील नऊ-दहा खेळाडू आधीच भारतात आहेत, कसोटी मालिकेची तयारी करत आहेत आणि आशा आहे की आम्ही भारताविरुद्ध चांगली कामगिरी करू शकू.’
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या फिटनेसवर कठोर परिश्रम घेतले जात आहेत. जेणेकरून हा गोलंदाज टी-२० मालिकेआधी तंदुरुस्त राहू शकेल. दुखापतीमुळे फर्ग्युसन टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला होता. मात्र, आता त्याने नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. गॅरी स्टेड हे फर्ग्युसनबद्दल म्हणाले, ‘तो लवकरच तंदुरुस्त होईल. आम्हाला त्याबाबत फक्त योग्य ती खात्री करायची आहे, जेणेकरून आम्हाला मालिकेदरम्यान कोणतीही समस्या येता कामा नये. पण मला आशा आहे की तो प्लेइंग इलेव्हनसाठी उपलब्ध असेल, जो खूप उत्तम असेल.’
टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करणाऱ्या न्यूझीलंडला या दौऱ्यात तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. १७ नोव्हेंबर रोजी जयपूर येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्याने या दौऱ्याची सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा कुटणारा फलंदाजच ठरतोय संघांसाठी बॅडलक! जाणून घ्या, कसं ते?
‘इंग्लंड कनेक्शन’मुळे वॉर्नरला सनरायझर्सकडून मिळाली नकोशी वागणूक, त्यानेही दिले जोरदार प्रत्युत्तर
टी२० विश्वचषकात फ्लॉप झालेल्या कोहलीने फिंचकडून शिकाव्यात ‘या’ गोष्टी, ज्याचा भारताला होईल फायदा!