भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान खासदार गौतम गंभीर नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो. तापट स्वभावासाठी ओळखला जाणारा गंभीर अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याला कोणताच अपवाद नसून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून आयपीएलपर्यंत चाहत्यांना गंभीरचा रूद्रावतार दिसला आहे. पण, सध्या गौतम गंभीरवर दु:खाचा डोंगर पडला आहे.
याबाबत, गौतम गंभीरने पीटच्या निधनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. तसेच गंभीरने पोस्टमध्ये एक भावनिक गोष्ट देखील लिहिली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये तुटलेल्या हृदयाचा इमोजी वापरला आहे, ज्यावरून स्पष्टपणे दिसून येते की तो खूप दुःखी झाला आहे.
सोशल मीडियावरती गंभीरने ट्टिटरच्या माध्यमातून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आणि जगाचा निरोप घेतलेला त्याचा कुत्रा पहायला मिळत आहे. तसेच या फोटोला कॅप्शन देत गंभीरने लिहिले की, “घरी परतणे असे कधीच होणार नाही! गुडबाय माय डिअर.” याबरोबरच, गंभीरने 2003 ते 2016 पर्यंत भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. गंभीर हा भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा खेळाडू होता. त्याने आपल्या कारकिर्दीत 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
Coming back home will never be the same! Farewell my dear 💔💔 pic.twitter.com/UErFZA5Qte
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) February 10, 2024
कसोटीच्या 104 डावांमध्ये त्याने 41.95 च्या सरासरीने 4154 धावा केल्या. या कालावधीत, त्याने 9 शतके आणि 22 अर्धशतके केली आहेत. तर, एकदिवसीय सामन्यांच्या 143 डावांमध्ये फलंदाजी करताना गंभीरने 39.68 च्या सरासरीने 5238 धावा केल्या. या कालावधीत, त्याने 11 शतके आणि 34 अर्धशतके केली आहेत. याशिवाय, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 36 डावांमध्ये गंभीरने 27.41 च्या सरासरीने आणि 119.02 च्या स्ट्राइक रेटने 932 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 7 अर्धशतके झळकावली आहेत
दरम्यान, आयपीएल 2024 पूर्वी आणखी एक मोठा बदल झाला आहे. गौतम गंभीरने 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाच्या कॅम्पमध्ये परतला आहे. गौतम गंभीर याआधी लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) संघाशी जुडलेला होता. गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला IPL 2012 आणि IPL 2014 चे विजेतेपद मिळवून दिले होते. गौतम गंभीर IPL 2022 आणि IPL 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघात मार्गदर्शकाच्या भूमिकेत होता.
महत्वाच्या बातम्या –
ओळखा पाहू! IPL 2024 पूर्वी गुजरात टायटन्सच्या खेळाडूने केला 90 च्या दशकातील अनोखा लुक…
पुन्हा आलं ग्लेन मॅक्सवेल नावाचं तुफान, जबरदस्त स्ट्राईक रेटसह ठोकलं शतक, रोहितच्या विक्रमाची बरोबरी