---Advertisement---

गौतम गंभीर आता दिसणार मेंटॉरच्या भूमीकेत, ‘या’ संघाने सोपवली मोठी जबाबदारी

On: शनिवार, डिसेंबर 18, 2021 4:38 PM
Gautam Gambhir
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) स्पर्धेचा १५ वा हंगाम वेगळा असणार आहे. कारण या हंगामापासून लखनऊ आणि अहमदाबाद असे दोन नवे संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यामुळे या संघांनी संघबांधणीसाठी तयारी सुरू केली असून महत्त्वाची बातमी आता समोर येत आहे. लखनऊ संघाने माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा दिल्लीचा खासदार गौतम गंभीरला सपोर्ट स्टाफमध्ये सामील केले आहे.

लखनऊ फ्रँचायझीने दोन वेळचा आयपीएल विजेता कर्णधार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला संघाचा मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून नेमले आहे. लखनऊ फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका यांनी शनिवारी (१८ डिसेंबर) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता गंभीर लखनऊ संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये आयपीएल २०२२ हंगामात दिसणार आहे.

गंभीरला आयपीएलचा मोठा अनुभव आहे. त्याने त्याच्या नेतृत्त्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाला २०१२ आणि २०१४ साली आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचेही नेतृत्त्व केले आहे. त्याने १५४ आयपीएल सामने खेळले असून ३१.२३ च्या सरासरीने ४२१७ धावा केल्या आहेत. यामध्ये ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.

असे म्हटले जात आहे की गोयंका आणि गंभीर यांच्यात आधीपासूनच चांगली मैत्री होती, पण आता त्यांच्यातील संबंध व्यावसायिक देखील झाले आहेत.

गंभीरने लखनऊ संघाचा मार्गदर्शक झाल्याबद्दल ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, ‘पुन्हा स्पर्धेत उतरणे हे एक अहोभाग्य आहे. डॉ. गोयंका यांचे मी आभार मानतो. त्यांनी मला लखनऊ आयपीएल संघाचा मार्गदर्शक म्हणून सामील केले आहे. जिंकण्यासाठी लागणारी ज्वाला अजूनही माझ्यामध्ये धगधगत आहे. विजेता म्हणून वासरा सोडण्याच्या विचाराने अजूनही माझ्यात उर्जा संचारते. मी फक्त ड्रेसिंग रुमसाठी नाही, तर संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी लढणार आहे.’

गोयंका यांच्या आरपीएसजी ग्रुपने लखनऊ फ्रँचायझी ७०९० कोटी रुपयांना विकत घेतली आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी काही दिवसांपूर्वीच अँडी फ्लॉवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विजय दहिया यांची देखील सहाय्यक प्रशिक्षक म्हणून लखनऊ संघात नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. सध्या दहिया उत्तर प्रदेश संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

रुटचा २०२१ वर्षात डंका! विव रिचर्ड्स, ग्रॅमी स्मिथ सारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान

विराट विरुद्ध गांगुली वादाचे पडसाद सोशल मीडियावरही, #WorldStandsWithKohli हॅशटॅग ट्रेंड

तब्बल ५०५ मिनिटे फलंदाजी अन् ९९ धावांवर बाद, वाचा गावसकरांच्या ‘हिरो’च्या खेळीबद्दल सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---