कित्येक भारतीय क्रिकेटपटू क्रिकेटव्यतिरिक्त सामाजिक कार्य प्राधान्य देतात. यात भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे नाव बऱ्याचदा आघाडीवर असते. आता नुकतेच त्याने आयोध्येत राम मंदीर उभारणीसाठी मोठी देणगी दिली आहे. गंभीर हा पूर्व दिल्लीचा खासदार आहे.
आयोध्येत राम मंदीर उभारण्यासाठी निधी गोळा करण्याचे अभियान सुरू झाल्यानंतर गंभीरने या कार्यासाठी १ कोटी रुपयांची देणगी दिली असल्याचे समजत आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुरु केले अभियान
निधी गोळा करण्याचे अभियान १४ जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली. त्यांनी सर्वात आधी ५ लाखांची देणगी राम मंदीर उभारणीसाठी दिले होते. त्यानंतर बॉलीवुड स्टार अक्षय कुमार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अशा अनेक मोठ्या सेलिब्रेटींनी देणगी दिली आहे. यात आता गौतम गंभीरचे नावही जोडले गेले आहे.
गंभीर याबाबत म्हणाला, ‘राम मंदीराची भव्य उभारणी सर्व भारतीयांचे स्वप्न आहे. त्यासाठी माझी आणि माझ्या परिवाराकडून हे छोटेसे योगदान आहे.’
याबरोबर दिल्लीतील भाजप पक्षाच्या नेत्यांनी सांगितले आहे की पूर्ण शहरातून निधी गोळा करण्यासाठी कुपण वाटप करुन मोहिम राबवण्यात येत आहेत. यात १०, १०० आणि १००० रुमयांचे कुपन आहेत.
गंभीरने केली अनेक समाजकार्य –
या दरम्यान गंभीर अनेकदा समाजकार्य करताना दिसून आला आहे. गंभीर याने काही दिवसांपूर्वीच गरीब लोकांच्या सेवेसाठी उपहारगृह सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. २४ डिसेंबरपासून दिल्लीच्या पुर्व भागात त्याने ‘जन रसोई’ नावाचे उपहारगृह सुरु केले आहे. येथे गरीब लोकांना केवळ एक रुपयात जेवण दिले जाते. याशिवाय लॉकडाऊनच्या काळात त्याने तृतीयपंथी नागरिकांसाठीही रेशन पुरवले होते. याबरोबरच त्याने खासदार निधी सरकारला कोरोना विरुद्ध लढण्यासाठी दान दिला होता.
निवृत्तीनंतर निवडले राजकीय क्षेत्र
२००३ ते २०१६ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व केल्यानंतर गंभीरने राजकीय क्षेत्राच्या खेळपट्टीवर नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. त्या अनुशंगाने २०१९ साली त्याने भारतीय जनता पार्टीत (भाजपा) प्रवेश घेतला आणि पूर्व दिल्लीकडून लोकसभेची निवडणूक लढवली. तो आता पूर्व दिल्लीचा खासदार आहे.
गंभीरची क्रिकेट कारकिर्द
गंभीरच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर त्याने एकूण १४७ वनडे सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ११ शतकांच्या मदतीने ५२३८ धावा केल्या आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये ५८ सामने खेळत ४१५४ धावा केल्या आहेत. यात एका द्विशतक आणि ९ शतकांचा समावेश आहे. टी२० क्रिकेटमध्यही त्याची आकडेवारी प्रशंसनीय राहिली आहे. ३७ टी२० सामन्यात २७.४१च्या सरासरीने त्याने ९३२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी मालिकेआधी इंग्लंडच्या कर्णधाराने टीम इंडियावर उधळली स्तुतीसुमने, म्हणाला…
“घरी येताना चांगले कपडे घालून ये”, भारतात परतल्यानंतर रहाणेला बायकोची ऑर्डर, जाणून घ्या कारण
कृणाल पंड्याबरोबर झालेला वाद आला अंगाशी; दीपक हुडावर झाली मोठी कारवाई