येत्या १७ ऑक्टोबर पासून युएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने बुधवारी (८ सप्टेंबर) टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला. या संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळाले. काही खेळाडूंना संघात मिळाले नाही, तर काही खेळाडूंना पुनरागमन करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान सर्वांना आश्चर्यचकित करणारा निर्णय म्हणजे एमएस धोनीची या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
ही घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर गौतम गंभीर ट्रोल होऊ लागला होता. पण आता स्वत: गौतम गंभीरने ही धोनीला सल्लागार बनवण्याबाबत आपले मत मांडले आहे.
गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले की,”धोनीची सल्लागार म्हणून नेमणूक करणे अगदी योग्य निर्णय आहे. या संघात मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण तसेच क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आहेत. हे सर्व कौशल्याने परिपूर्ण आहेत. परंतु, धोनी मोठ्या स्पर्धेत ज्याप्रकारे दबावावर नियंत्रण मिळवतो, त्यामुळेच कदाचित त्याची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली असावी. भारतीय संघात अनेक युवा खेळाडू आहेत. ज्यांना विश्वचषक स्पर्धा खेळण्याचा अनुभव नाही. अशा खेळाडूंना धोनीचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल.”
“या संघात वरूण चक्रवर्ती, राहुल चाहर सारखे युवा क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी अजुनपर्यंत एकही विश्वचषक स्पर्धा खेळली नाहीये. अशावेळी दबावावर नियंत्रण मिळवण्याची धोनीची पद्धत या खेळाडूंसाठी फायदेशीर ठरू शकते. धोनीने ज्याप्रकारे कठीण सामन्यात भारतीय संघाला सावरले आहे, त्याचा नक्कीच टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला फायदा होणार आहे,” असेही गंभीर म्हणाला.(Gautam Gambhir explained the role of ms dhoni in upcoming T-20 world cup)
आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर
महत्त्वाच्या बातम्या –
असे ५ खेळाडू, ज्यांनी २०१४ आणि २०१६ नंतर २०२१ च्या टी२० विश्वचषकासाठीही मिळवले टीम इंडियात स्थान
टी२० विश्वचषकासाठी निवड झाल्याचे कळताच कशी होती राहुल चाहरची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ