---Advertisement---

या खेळाडूची टीम इंडियात निवड झाल्याने खुश झालेल्या गंभीरने केले हे खास ट्विट!

On: शनिवार, ऑक्टोबर 26, 2019 1:32 PM
---Advertisement---

3 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी केरळचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने भारतीय संघात जवळ जवळ 4 वर्षांनी पुनरागमन केले आहे.

त्याची टी20 संघात निवड झाल्याने भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीरने आनंद व्यक्त केला आहे.

गंभीरने ट्विट करत सॅमसनला शुभेच्छा दिल्या आहेत. गंभीरने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘टी20 संघात निवड झाल्याबद्दल शुभेच्छा संजू सॅमसन. हलके हात, चपळ पावले आणि आशा आहे की संतुलित डोके… संजू जा हा बऱ्याच काळापासून थकीत असलेला तूझा क्षण आहे, तो झेल.’

याआधी काही दिवसांपासून सॅमसनला भारतीय संघात संधी मिळायला हवी, असे मत गंभीरने मांडले होते.

सॅमसन याआधी भारताकडून 19 वर्षांचा असताना 19 जुलै 2015 ला झिम्बाब्वे विरुद्ध एकमेव टी20 सामना खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी तब्बल 4 वर्षे लागली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---