भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात आगामी 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर (Border Gavaskar Trophy) मालिका खेळली जाणार आहे. ज्याची सुरूवात (22 नोव्हेंबर) पासून होणार आहे. दोन्ही संघ पर्थच्या मैदानावर पहिल्या सामन्यासाठी आमने-सामने असणार आहेत. त्यासाठी दोन्ही संघांची घोषणा झाली आहे. तत्पूर्वी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरची (Shardul Thakur) संघात निवड करण्यात आली नाही. त्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) जागी नितीश कुमार रेड्डीला (Nitish Kumar Reddy) संघात निवडण्याबाबत गौतम गंभीरला (Gautam Gambhir) विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी मोठे वक्तव्य केले. गौतम गंभीर म्हणाले की, आता पुढे जाण्याची वेळ आली आहे आणि त्यांनी या संघाला दौऱ्यासाठी सर्वोत्तम संघ म्हटले. शार्दुल ठाकूरपेक्षा नितीश कुमार रेड्डीला महत्त्व देण्याबाबत गौतम गंभीर म्हणाले की, “हा निर्णय पुढे जाण्याचा आहे. मला वाटते की ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी आम्ही भारतीय संघासाठी निवडलेला खेळाडूंचा हा सर्वोत्तम संघ आहे.”
यानंतर गंभीर यांनी नितीश कुमार रेड्डीवर विश्वास व्यक्त करत म्हटले की, “आम्ही आमच्यासाठी काम करू शकेल असा सर्वोत्तम संघ निवडला आहे. नितीश रेड्डी हा कमालीचा प्रतिभावान खेळाडू आहे. जर त्याला संधी दिली तर तो उत्कृष्ट कामगिरी करेल.”
नितीश व्यतिरिक्त या संघात हर्षित राणाच्या (Harshit Rana) निवडीबाबतही गंभीर म्हणाले की, “आसामविरूद्ध खेळल्या गेलेल्या प्रथमश्रेणी सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली. एकीकडे प्रथम श्रेणी सामने खेळण्याऐवजी त्याला गोलंदाजीचा पुरेसा अनुभव मिळावा, असे आम्हा सर्वांना वाटत होते. वेगवान गोलंदाज ताजे ठेवणेही आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळेच त्याला संघात स्थान मिळाले आहे.”
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया संघ- पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क
बॉर्डर गावसकर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; “मला अशा संघात खेळायचे आहे…” आयपीएलपूर्वी केएल राहुलने व्यक्त केली इच्छा
मुंबईनं केलं रिटेन, पण हार्दिक नाही खेळणार आयपीएलचा पहिला सामना, कारण काय?
भारताशिवाय चॅम्पियन्स ट्राॅफी खेळली जाऊ शकते, माजी कर्णधाराचे मोठे वक्तव्य!