भारतीय संघाला मायदेसातील विश्वचषक जिंकता आला नाही. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात संघाकडे यावर्षी तिसऱ्यांना वनडे विश्वचषक जिंकण्याची संधी होती. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला मात मिळाली. पराभवानंतर रोहित शर्मा याने राहुल द्रविडबाबत एक वक्तव्य केले होते, जे माजी दिग्गज गौतम गंभीर याला पटले नाही. गंभीरने रोहितच्या वक्तव्याबाबत नाराजी बोलून दाखवली.
वनडे विश्वचषक (ODI World Cup 2023) संपल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून भारतीय संघासोबतचा कार्यकाळ संपला. द्रविड यापुढे संघासोबत प्रशिक्षक म्हणून असणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता आली नाहीये. द्रविडच्या मार्गदर्शनात संघ यावर्षी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अंतिम सामन्यातील पराभवानंतर द्रविडसाठी विश्वचषक जिंकू शकलो नाही, अशी खंद व्यक्त केली होती. पण गोंतम गंभीर (Gautam Gambhir) याने म्हटल्याप्रमाणे रोहितचे हे विधान चुकीचे आहे. संघाने कोणा एका व्यक्तिसाठी विश्वचषक जिंकण्याचा विचार करणे योग्य नाही. विश्वचषक देशासाठी जिंकला पाहिजे, असे गंभीर म्हणाला.
नुकताच गंभीर एका माध्यामासाठी बोलताना म्हणाला, “प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रशिक्षक विश्वचषक जिंकू इच्छितो. मला आजही समजत नाही की, असे का होते. 2011 मद्येही असेच झाले. तुम्हाला कोणा एका व्यक्तिसाठी विश्वचषक जिंकायचा असेल, तर ते योग्य नाही. तो व्यक्ती कोण आहे, यामुळे काहीच फरक पडत नाही. तुम्ही देसासाठी विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करता. तुम्हीला एखाद्या व्यक्तीसाठी विश्वचषक जिंकावा वाटत असले, तरी ते मीडियासमोर बोलू नका. स्वतःपूरते मर्यादित ठेवा. 2011 मध्ये मलाही हा प्रश्न विचारला गेला होता. पण मी उत्तर दिले होते की, विश्वचषक देशासाठी जिंकायचा आहे. मी बॅठ उचलतो आणि देशासाठी फलंदाजी करतो.”
दरम्यान, विश्वचषकातील भारताचे प्रदर्शन पाहिले, तर संघ विजेतेपदासाठी सर्वात मोठा दावेदार होता. एकही पराभव न स्वाकारता भारत अंतिम सामन्यात पोहोचला, पण याठिकाणी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 6 विकेट्सने पराभव स्वाकारावा लागला. (Gautam Gambhir is upset with Rohit Sharma’s statement)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 । विलियम्सन का नाही बनला गुजरात टायटन्सचा कर्णधार? माजी सलामीवीराने दिले उत्तर
कसोटीत ग्लेन फिलिप्सचे जोरदाक कमबॅक, सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशची धावसंख्या 300+