---Advertisement---

शाकिब अल हसनने निवडला आयपीएल इलेव्हन संघ; या भारतीय खेळाडूला मिळाले कर्णधारपद

On: गुरूवार, जून 25, 2020 5:39 PM
---Advertisement---

बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला दु:ख आहे, की भारतीय सट्टेबाजाबद्दल माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला दिली नाही. त्याच्या या वेडेपणामुळे त्याच्यावर दोन वर्षाची बंदी घातली गेली. ज्यामध्ये एक वर्षाचे निलंबन आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान भारतीय सट्टेबाज दीपक अगरवालच्या संपर्क करण्याची माहिती न दिल्यामुळे त्याच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे.

क्रिकबझ इन कन्व्हर्सेशन” दरम्यान शाकिबने (Shakib Al Hasan) हर्षा भोगलेला (Harsha Bhogle) सांगितले, “जेव्हा मी भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यांना भेटलो, तेव्हा मी संपर्क करण्याच्या घटनेला खूप हलकं घेतलं आणि त्यानंतर त्यांना सगळं सांगितलं व त्यांना सगळं माहित आहे. त्याने सर्व साक्ष दिल्या आणि जे झालं ते सगळं त्यांना माहित आहे.”

“आयसीसीच्या चौकशीच्या संदर्भात त्याने सांगितले खरं सांगायचं तर हे एकमात्र कारण आहे. माझ्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली. अन्यथा माझ्यावर ५ किंवा १० वर्षाची बंदी घालण्यात आली असती,” असेही तो पुढे म्हणाला.

बंदीच्या अगोदर जबरदस्त लयीत असलेल्या शाकिबने इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ विश्वचषकात ६०६ धावा केल्या होत्या.

“परिस्थितीनुसार ज्या पद्धतीने वागलो त्याबद्दल मला खेद आहे. माझ्या अनुभवामुळे आणि मी जेवढे आंतरराष्ट्रीय सामने खेळलो आहे. आणि आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी आचारसंहितेचा जेवढा अभ्यास केला. यामुळे मी मूर्खपणाने चूक केली असे मला वाटते. मी त्या आधारावर निर्णय घेतला पाहिजे. अशाप्रकारच्या गोष्टी कधीही हलक्यात घेऊ नका,” असेही तो पुढे म्हणाला.

तो म्हणाला, “मला याबद्दल वाईट वाटते. कोणीही असे संदेश किंवा फोन हलक्यात घेऊ नये. किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नये. सुरक्षित राहण्यासाठी आपण याची माहिती आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली पाहिजे. आणि मला वाटते, की मी हा मोठा धडा शिकलो आहे.”

शाकिबने सांगितले की त्याच्यात थोडीशी झुंबड उडाली होती. आणि सट्टेबाजाशी संपर्क साधण्याबाबत त्वरीत माहिती न देऊन आपण काहीतरी चुकीचे करीत आहे, असे त्याला कधीच वाटले नाही. या अष्टपैलूची बंदी २९ ऑक्टोबर रोजी संपणार आहे.

हर्षा भोगले बरोबर बोलताना या दरम्यान शाकिबने आपल्या पसंतीची आयपीएल प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. तर त्याने गौतम गंभीरला कर्णधार बनवलं आहे.

शाकिबचा आयपीएल प्लेइंग इलेव्हन संघ-

डेव्हिड वॉर्नर, रॉबिन उथप्पा, गौतम गंभीर (कर्णधार), मनीष पांडे, शाकिब अल हसन, युसूफ पठान, आंद्रे रसेल, सुनील नारायण, भुवनेश्वर कुमार, लक्ष्मीपति बालाजी, उमेश यादव

ट्रेंडिंग घडामोडी-

-सचिन तेंडूलकर विरुद्ध राहुल द्रविड: शेवटी याचं उत्तर मिळालंच, पहा कोण आहे मोठा क्रिकेटर

-क्रिकेट विश्वविजेत्या भारताच्या ट्राॅफी नक्की आहेत तरी कुठं?

-१९८३च्या कपिल देव आणि २०१७च्या हरमनप्रीत कौर यांच्या खेळीतील साम्य !

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---