आशिया चषक 2022 मधील शेवटच्या सामन्यात विराट कोहली याने शतक केले आणि चाहत्यांच्या आनंदाला सीमाच राहिल्या नाहीत. विराटच्या कारकिर्दीतील हे 71 वे शतक होत. तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर त्याचे शतक चाहत्यांना पाहायला मिळाले. विराटने हे शतक सलामीवीराच्या रूपात केल्यामुळे आगामी टी-20 विश्वचषकात देखील तोच सलामीसाठी येईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. मात्र, भारताचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीर याच्याशी सहमत नसल्याचे दिसते.
माध्यमांशी बोलताना गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला विराटने सलामीसाठी यावे की नाही? असा प्रश्न विचारला गेला. यावर उत्तर देताना गंभीरने स्पष्ट केले की, रोहित शर्मा आणि केएल राहुल संघात असल्यामुळे विराट कोहली (Virat Kohli) याला डावाची सुरुवात करता येणार नाही. आशिया चषकात आफगाणिस्तानविरुद्ध विराट सलामीवीराच्या रूपात रोहितच्या साथीने खेळला होता. या सामन्यात त्याने टी-20 कारकिर्दीतील पहिले, तर एकंदरीत 71 वे आंतरराष्ट्रीय शतक केले.
गंभीर म्हणाला, “मी आधीही असे म्हटलो होतो की, या विषयावर वाद नको. तिसऱ्या क्रमांक नेहमीच लवचिक असला पाहिजे. कारण तुमचे सलामीवीर जर 10 षटकांपर्यंत खेळले, तर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आला पाहिजे. असे झाले तर धावांची गती वाढेल. जर विकेट्स लवकर गेल्या, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आला पाहिजे.”
दरम्यान, विराट आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी सलामीवीराच्या रूपात खेळत आला आहे. पण भारतीय संघासाठी मात्र तो सलामीवीराच्या रूपात खेळू शकला नाही. केएल राहुल आणि रोहित शर्मा या जोडीने सलामीवीराच्या रूपात चांगले काम केल्यामुळे त्याला ही संधी मिळत नसल्याचे दिसले आहेत. राहुलच्या आधी शिखर धवन रोहितच्या जोडीने सलामीसाठी येत होता.
टी-20 विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
राखीव खेळाडू –
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपआधीच रोहित आणि द्रविडला मिळाली वॉर्निंग! काय आहे संपूर्ण प्रकरण?
विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा! टी20 इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
गुजरात टायटन्सने शुबमन गिलला दिला नारळ? ट्विट करत लिहिले…






