---Advertisement---

गंभीरने केला आपल्या घरात काम करणाऱ्या महिलेचा अंत्यसंस्कार; वाहिली श्रद्धांजली

On: शनिवार, एप्रिल 25, 2020 8:31 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि सध्याचा खासदार गौतम गंभीरने आपल्या घरात काम करणाऱ्या सरस्वती पात्रा या महिलेचा अंत्यसंस्कार केला आहे. कारण कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे या महिलेचा मृतदेह ओडिसा येथील तिच्या मुळ गावी पोहोचवता आला नाही.

गंभीरने आपल्या घरात काम करणाऱ्या सरस्वतीला आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून श्रद्धांजली वाहिली आहे. सरस्वती मागील ६ वर्षांपासून गंभीरच्या घरात काम करत होती.

ट्वीट करत गंभीर म्हणाला की, “माझ्या मुलांची काळजी घेणारी महिला घरात काम करणारी महिला असू शकत नाही. ती माझ्या कुटुंबाचा एक भाग होती. तिच्यावर अंत्यसंस्कार करणे माझे कर्तव्य होते.”

 

३८ वर्षीय गंभीरने (Gautam Gambhir) पुढे लिहिले की, “मला नेहमी वाटते की, व्यक्ती कोणत्याही जातीचा, धर्माचा, वर्गाचा आणि सामाजिक दर्जाचा असो, त्याला नेहमीच सन्मान मिळाला पाहिजे. यानेच आपण एक चांगला समाज आणि देश निर्माण करू शकतो. ओम शांती”

एका वृत्तानुसार ४९ वर्षीय सरस्वती (Sarasvati Patra) ओडिसाच्या जाजपूर जिल्ह्यातील रहिवाशी होत्या.

सरस्वतीला मागील काही दिवसांपूर्वी सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच तिला बऱ्याच दिवसांपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार होता. २१ एप्रिलला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी गंभीरचा प्रशंसा केली आहे.

गंभीरने भारताकडून एकूण ५८ कसोटी सामने, १४७ वनडे सामने आणि ३७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.  यामध्ये त्याने ४१.९५ च्या सरासरीने एकूण ४१५४ धावा केल्या आहेत. यात ९ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेत त्याने ३९.६८ च्या सरासरीने एकूण ५२३८ धावा केल्या आहेत. यात ११ शतके आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच टी२० त्याने २७.४१ च्या सरासरीने ९३२ धावा केल्या आहेत. त्यात केवळ ७ अर्धशतकांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये त्याने १५४ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३१.२३ च्या सरासरीने ४२१७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-रोहित शर्मासाठी हे आहेत सचिनबरोबर घालवलेले सर्वोत्तम ५ क्षण

-सचिन-रहाणे पहिल्या भेटीसाठी रहाणेने पाहिली होती ७ तास वाट

-गुड न्यूज- या देशात सुरु होणार शनिवारपासून क्रिकेटचे सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---