इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला आजपासून(30 मे) सुरुवात झाली आहे. या विश्वचषकात कोणते संघ उपांत्य फेरी गाठू शकतील याबद्दल अनेक दिग्गजांनी अंदाज बांधले आहेत. यात आता नवनिर्वाचीत खासदार आणि भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचाही समावेश झाला आहे.
त्याने टाईम्स ऑफ इंडियासाठी लिहिलेल्या स्तंभलेखात लिहिले आहे की भारत उपांत्य सामन्यात प्रवेश करेल पण भारताचा कर्णधार विराट कोहलीला तीव्रता दाखवावी लागलेल.
त्याने लिहिले आहे की ‘भारत उपांत्य सामन्यात प्रवेश करणाऱ्या माझ्या चार संघांपैकी एक आहे. पण हे विराटने जर तशी तीव्रता दाखवली तर होईल.’
भारताबरोबरच गंभीरने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ देखील उपांत्य सामन्यात पोहचतील असे म्हटले आहे.
याबद्दल त्याने लिहिले आहे की ‘उपांत्य सामन्यात प्रवेश करणाऱ्या माझ्या अन्य तीन संघांमध्ये
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाबाबत सांगायचे तर त्यांचे प्रशिक्षक जस्टिन लँगरमुळे मी त्यांच्या बाजूने आहे. मला वाटते त्यांचे मॅन-मॅनेजमेंटचे कौशल्य हे ऑस्ट्रेलियाची एक ताकद आहे. लँगर तेवढा प्रतिभावान फलंदाज नव्हता पण हीच गोष्ट त्याला ही भूमिका समजायला मदत करते.’
तसेच अन्य दोन संघांबद्दल गंभीर म्हणाला, ‘इंग्लंड आणि न्यूझीलंड परिस्थितीला अनुरुप चांगले क्रिकेट खेळत आहेत. जर गरमी असेल तर त्यांच्याकडे आक्रमण करणारे फलंदाज आहेत. पण जर चेंडू काही प्रमाणात हरकत दाखवत असेल तर त्यांच्याकडे त्याचा फायदा उचलणारे गोलंदाज आहेत.’
‘इंग्लंडने त्यांचा स्तर उंचावला आहे. त्यामुळे या स्तराची बरोबरी करण्याची वेळ आहे. मी कोलकता नाईट रायडर्समध्ये असताना इयान मॉर्गनबरोबर वेळ घालवला आहे. त्याचे सुदैव आणि प्रतिभा त्यांच्यासाठी(इंग्लंडसाठी) काम करेल, माझ्यावर विश्वास ठेवा. इंग्लंडची शानदार नवीन जर्सी मॉर्गनची जादू वाढवेल.’
या विश्वचषकाचा आज(30 मे) पहिला सामना यजमान इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका विरुद्ध होत आहे. या विश्वचषकात भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिका विरुद्ध साऊथँम्पटनला होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–युजवेंद्र चहलने चक्क प्रशिक्षक रवी शास्त्रींना टाकला बाउंसर, पहा व्हिडिओ






