शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने दणदणीत पराभव केला. या सामन्याची सातत्याने चर्चा होत आहे. असे असताना भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने पाकिस्तान संघाविषयी एक मोठे वक्तव्य केले आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान भारतीय प्रेक्षक जास्त होते. तर, पाकिस्तानी प्रेक्षकांची संख्या अत्यंत कमी होती. या सामन्यातील असे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात काही भारतीय चाहते मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
गौतम गंभीरच्या मते चाहत्यांनी अशा गोष्टी करू नयेत. ते म्हणाला की, एखाद्या संघाला पाठिंबा देणे ही वेगळी गोष्ट आहे, पण दुसऱ्याचा अपमान करू नये.
प्रसारण वाहिनीशी बोलताना तो म्हणाला, “तुमच्या संघाला सपोर्ट करा मात्र, पाहुण्यांशी गैरवर्तन करू नका. ते आपले पाहुणे आहेत आणि ते येथे विश्वचषक खेळण्यासाठी आले आहेत. या गोष्टी आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे.”
या सामन्याचा विचार केल्यास भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा डाव 191 धावांवर गुंडाळला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके करत भारतीय संघाला सात गडी राखून मोठा विजय मिळवून दिला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
(Gautam Gambhir Slam Indian Fans Who Troll Pakistani Cricketers)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाला सावरण्यासाठी येणार संकटमोचक! ‘या’ दिवशी भारताकडे करणार प्रयाण
‘आता सुरुवात करावी लागेल’, पहिल्या दोन पराभवांनंतर कमिन्सने उचलला विडा, प्रत्येक सामना फायनलप्रमाणे