केपटाऊन येथील न्यूलँड्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना (Third Test) सुरू आहे. या सामन्यासाठी पाहुण्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये २ महत्त्वपूर्ण बदल (2 Changes In Team India) करण्यात आले आहेत. भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे या सामन्यातून पुनरागमन झाले (virat Kohli Comeback) आहे. तो मागील सामन्यात दुखातपतीमुळे संघाबाहेर होता. त्याच्याजागी हनुमा विहारी (Hanuma Vihari) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले गेले होते. मात्र विराटचे पुनरागमन झाल्यामुळे त्याला पुन्हा एकदा बाकावर बसावे लागले आहे. याच मुद्द्यावरून भारताचा माजी दिग्गज गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
माजी भारतीय सलामीवीर गंभीरच्या मते, (Gautam Gambhir On Hanuma Vihari) विराटमुळे विहारीला संघाबाहेर न करता अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला वगळले गेले पाहिजे होते.
टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात लिहिलेल्या एका कॉलममध्ये गंभीर म्हणाला की, अंतिम कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला सर्वकाही करावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना अनिर्णीत राखूनही आनंदीच असेल. त्यातही जर त्यांनी भारतीय संघाला पराभूत केले तर त्यांचीच लॉटरीच लागेल. पण आता विराट भारतीय संघात परत येतोय. यावरून पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना माझे बोलणे खटकणार आहे. पण भारतीय कर्णधाराच्या जागी रहाणेला संघाबाहेर केले जायला पाहिजे होते आणि विहारीला मधल्या फळीत संधी द्यायला हवी होती.
व्हिडिओ पाहा-
यापूर्वीही विहारीला संघाच्या आवश्यकतेनुसार बाकावर बसवले गेले आहे, जेणेकरून वरिष्ठ फलंदाजांना संघात घेता येईल. पण मला नाही वाटत की, युवा खेळाडूंसोबत असे व्हायला पाहिजे. मी रहाणेच्या विरोधात नाही. तो खूप चांगला व्यक्ती आहे आणि मागच्या सामन्यात तो चांगल्या लयीतही दिसला होता.पण जर भारतीय क्रिकेटशी माझे कोणतेही नाते असते तर मी विहारीची जास्त चिंता केली असती, ना की रहाणेची, असे त्याने पुढे म्हटले.
भारताचा अनुभवी फलंदाज रहाणे मागील बऱ्याच महिन्यांपासून मोठ्या धावा करू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र यापूर्वी झालेल्या जोहान्सबर्ग कसोटीमध्ये त्याने अर्धशतकी खेळी करत स्वतला सिद्ध केले होते. या सामन्यात त्याने ५८ धावा जोडल्या होत्या. तसेच विहारीनेही पहिल्या डावात २० धावा आणि दुसऱ्या डावात नाबाद ४० धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
SAvsIND, 3rd Test, Live: भारताला दोन मोठे धक्के! केएल राहुल-मयंक अगरवाल परतले तंबूत
वामिकाचा वाढदिवस आणि भारताच्या विजयाचे आहे खास कनेक्शन, पहिल्या बड्डेला द. आफ्रिका होणार फत्ते!
हेही पाहा-