---Advertisement---

गौतमची कोहलीवर ‘गंभीर’ टीका, केवळ या कारणामुळे कोहली यशस्वी कर्णधार

On: शुक्रवार, सप्टेंबर 20, 2019 3:53 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने म्हटले आहे की भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला रोहित शर्मा आणि एमएस धोनीचा पाठिंबा मिळाल्याने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगले नेतृत्व करु शकतो.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार विद्यापिठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गंभीर म्हणाला, ‘विराटला अजून पुढे जायचे आहे. विराटने विश्वचषकात चांगली कामगिरी केली पण त्याला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगले नेतृत्त्व करु शकतो कारण अनेक वर्षांपासून त्याच्याबरोबर रोहित शर्मा आणि एमएस धोनी आहेत.’

‘नेतृत्वाची गुणवत्ता जेव्हा फ्रान्चायझी क्रिकेट खेळता तेव्हा दिसून येते, ज्यावेळी तूमच्याकडे तूम्हाला साथ देणारे क्रिकेटपटू नसतात.’

‘मी याबद्दल नेहमी प्रामाणिकपणे बोलतो. रोहितने जे मुंबई इंडियन्सकडून यश मिळवले आहे आणि धोनीने जे चेन्नई सुपर किंग्सकडून यश मिळवले आहे, ते पहा. जर तूम्ही त्याची तूलना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी केली तर त्याचा निकाल सर्वचजण पाहू शकता.’

याबरोबरच गंभीरने रोहितला कसोटीत सलामीला पाठवण्याचा निर्णय योग्य असल्याचेही म्हटले आहे. तो म्हणाला, ‘मला वाटते केएल राहुलला खूप वेळ दिला गेला. आता रोहितने कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी करण्याची वेळ आहे. जर तूम्ही त्याला संघात घेतले आहे तर त्याला अंतिम 11 जणांच्या संघातही स्थान दिले पाहिजे.’

‘जर तो अंतिम 11 जणांच्या संघात फिट बसत नसेल तर त्याला 15 किंवा 16 जणांच्या संघात घेऊन काय उपयोग. तो इतका चांगला खेळाडू आहे की तूम्ही त्याला बेंचवर बसवू शकत नाही.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

तो झेल पाहुन चक्क विराट कोहलीही झाला अचंबित, पहा व्हिडिओ

वाढदिवस विशेष: राशिद खान विषयी माहित नसलेल्या ५ खास गोष्टी…

टीम इंडियाकडून सुमार कामगिरी करणारा रिषभ पंत आता खेळणार या संघाकडून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment