आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज युवराज सिंगनंतर आता माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा खासदार गौतम गंभीरनेही सध्याच्या भारतीय संघावर निशाना साधला आहे.
गंभीरने भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माचे (Rohit Sharma) नाव न घेता म्हणाला की, ज्याप्रकारे आमच्या काळात युवा खेळाडूंची मदत केली जात होती, त्याप्रकारे आता संघाचे अनुभवी खेळाडू युवा खेळाडूंची मदत करत नाहीत.
यापूर्वी युवराज (Yuvraj Singh) म्हणाला होता की, आताचे युवा खेळाडू अनुभवी सीनियर खेळाडूंची मदत करत नाहीत, जसे आमच्या काळात करत होते.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत गंभीर म्हणाला की, “भारतीय संघात आदर्श खेळाडूंची कमतरता आहे, युवराजच्या या मताशी मी सहमत आहे. २०००मध्ये आमच्या समोर संघाला मार्गदर्शन करण्यासाठी राहुल द्रविड, अनिल कुंबळे, व्हिव्हिए लक्ष्मण, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांसारखे खेळाडू होते.”
गंभीर पुढे म्हणाला की, “सध्याच्या भारतीय संघात असे अनुभवी खेळाडू नाहीत. जे युवा खेळाडूंची चांगल्याप्रकारे मदत करतील.”
युवराज आणि गंभीर दोघेही २००७मध्ये आंतरराष्ट्रीय टी२० विश्वचषक आणि २०११मध्ये वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग होते. भारतीय संघाने हे दोन्ही विश्वचषक एमएस धोनीच्या नेतृत्वात जिंकले होते. २०११ विश्वचषकात (World Cup) गंभीरने ९ सामन्यात ४३.६६च्या सरासरीने ३९३ धावा केल्या होत्या.
श्रीलंकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात त्याने ९७ धावांची तूफान विजयी खेळी केली होती. तर युवराज या विश्वचषकात मालिकावीर ठरला होता. त्याने ९ सामन्यात ३६२ धावांबरोबरच १५ विकेट्सही घेतल्या होत्या.
गंभीर सध्या लॉकडाऊनमध्ये घरीच वेळ घालवत आहे. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांच्या मदतीसाठी त्याने आपल्याकडून मोठी मदत केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयसीसीने सांगितली अशी एक गोष्ट की भारतीय चाहते झाले आनंदाने वेडे
-धोनीच्या निवृत्तीवर पाकिस्तानी क्रिकेटरने केले भाष्य, चाहत्यांनी वाहिली शिव्यांची लाखोली
-पैसे नसल्याने साध्या बसने क्रिकेट खेळायला जाणाऱ्या जगातील मोठ्या संघावर कोरोनामुळे संकट