भारतीय संघ रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरल्यानंतर सर्वांना एक आश्चर्याचा धक्का बसला. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेक जिंकली, पण सोबतच एक धक्कायक माहिती देखील दिली. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत या सामन्यात खेळत तसल्याचे रोहितने सांगितले. पंत प्लेइंग इलेव्हनचा भाग नसल्यामुळे भारताचा माजी दिग्गज सलामीवीर गौतम गंभीरने आश्चर्य व्यक्त केले.
गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यादरम्यान समालोचकाची भूमिका पार पाडत होता. रिषभ पंत (Rishabh Pant) भारतीय संघाचा नियमित फलंदाज आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात देखील तो महत्वाची भूमिका पार पाडेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पंत प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्याची माहिती दिल्यानंतर चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. गंभीरला देखील या निर्णयाविषयी आश्चर्य वाटते. समालोचनादरम्यान गंभीर म्हणाला की, “रिषभ पंत प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही, याचे खूप आश्चर्य वाटते.”
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, आवेश खान.
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, हरिस रौफ, नसीम शाह, शाहनवाज दहनी, मोहम्मद नवाज.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताच्या स्विंग किंगकडून पाक संघाचा किंग गपगार; असा फसवला की डोकं हलवतंच तंबूत परतला
विराट कोहली ‘100 नॉटआउट!’ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नावावर केला मोठा विक्रम
महायुद्धाला सुरूवात! नाण्याचे नशिब भारताच्या बाजूने; टीम इंडिया करणार बॉलने पहिला वार