भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) भारताचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरला 2011-12, 2012-13 आणि 2014-15 या वर्षी परदेशात खेळलेल्या स्पर्धांमधून मिळालेल्या एकूण महसूलातील एक शेअर म्हणून 1,04,24,507 रुपये देणार आहे.
याची माहिती बीसीसीआयने अधिकृत बेवसाइटवर जाहिर केली आहे. गंभीर मागील दोन वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2016 ला इंग्लंड विरुद्ध राजकोटला खेळला होता.
इंग्लंड विरुद्ध झालेल्या त्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो पहिले दोन कसोटी सामने खेळला होता. त्यानंतर मात्र त्याला संघातून वगळले गेले.
पण तरीही गंभीरची देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी होत आहे. त्याने 2017-18 च्या रणजी मोसमात 683 धावा केल्या होत्या. तसेच तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा सहाव्या क्रमांकाचा खेळाडू होता. परंतू त्याला तरीही शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये संधी देण्यात आली नाही.
गौतम गंभीर बरोबरच बीसीसीआय 19 वर्षांखालील भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडला जून महिन्याची व्यवसायिक फी म्हणून 40,50,000 रुपये देणार आहे. तसेच चेतेश्वर पुजारालाही 10% रिटेनरशिप फी म्हणून 27,00,000 रुपये देण्यात येणार आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ!
–अटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते
–खास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी