---Advertisement---

आयपीएलचा भावी आंद्रे रसेल; गौतम गंभीरने ‘या’ युवा खेळाडूचं केलं तोंडभरुन कौतुक

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 3:21 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी आज (१८ फेब्रुवारी) चेन्नईत खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावात जगभरातील एकूण १११४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यापैकी २९२ खेळाडूंवर ६१ जागांसाठी बोली लावण्यात येणार आहे. या सत्रात प्रत्येक संघ मजबूत संघासह मैदानात उतरण्याच्या तयारीत असणार आहे. अनेक संघांनी आपले स्टार खेळाडू रिलीज केले आहेत. यात ग्लेन मॅक्सवेल, हरभजन सिंग, शाकिब अल हसन आणि स्टीव्ह स्मिथ यांसारख्या बड्या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच लिलावात प्रतिभाशाली खेळाडूंना आपल्या संघात सामाविष्ट करून घेण्यासाठी संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळेल.

कायल जेमिसन ठरू शकतो पुढील आंद्रे रसल
अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर याने न्यूझीलंडच्या अष्टपैलू कायल जेमिसनचे कौतुक करत म्हटले आहे की, तो भविष्यात आंद्रे रसलची जागा घेऊ शकतो. गंभीरने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “जेमिसन यावेळी कुठलच मोठं नाव नाही. परंतु तो सुपरस्टार होऊ शकतो. सर्व संघ त्याला संघात सामाविष्ट करू पाहतील. तो ७ फूट उंच आहे. १४० च्या गतीने गोलंदाजी करतो. तो पुढील आंद्रे रसल बनू शकतो.”

तसेच पुढे तो म्हणाला, “तो पूर्णपणे तयार झाला आहे. किंग्स इलेव्हन पंजाब संघाला अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. त्यामुळे ते जेमिसन बद्दल विचार करू शकतात.”

कोण आहे कायल जेमिसन?
कायल जेमिसन याने भारतीय संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यांनतर त्याने आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळले आहेत. तसेच ४ टी -२० सामने खेळले आहेत. भारतीय संघाविरुद्ध झालेल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने ३९ देत ४ गडी बाद केले होते. यात त्याला भारतीय संघाचे मुख्य फलंदाज ,चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांना बाद करण्यात यश आले होते. यात सामन्यात त्याने ४४ धावांची खेळी देखील केली होती.

तसेच पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याने ११ गडी बाद केले होते. क्रिकेटच्या तीनही प्रकारात त्याचा स्ट्राईक रेट १०० पेक्षा जास्त आहे. तो गोलंदाजी मध्ये ही कमाल करू शकतो तसेच ६ व्या आणि ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन मोठे फटके ही खेळू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL Auction 2021 ने हार्दिक पंड्या भावुक; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, “आपल्या स्वप्नांच्या सामर्थ्याला कमी..”

आयपीएल लिलावाआधीच सचिनचा लेक मुंबई इंडियनच्या ताफ्यात? सोशल मीडियावर चर्चेला उधान

अश्विनच्या शतकाचं जोरदार सेलिब्रेशन करणाऱ्या सिराजला सचिन म्हणतो, ‘…म्हणून मला तुझा अभिमान आहे’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---