भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रोहित शर्मा याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, रोहित शर्मा गेल्या दोन मोसमात चांगला फाॅर्म दाखवत नव्हता आणि म्हणूनच कदाचित त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि हार्दिक पंड्या याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले.
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 साठी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याला हटवून हार्दिक पंड्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली असून याबाबत अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयाला बहुतांश चाहत्यांनी विरोध केला आहे.
तर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्यामागे मोठे कारण सांगितले आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना ते म्हणाले, “काय बरोबर आणि काय अयोग्य यात आपण पडू नये. मुंबई इंडियन्सने संघाच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. तुम्ही म्हणू शकता की, गेल्या दोन वर्षांत रोहित शर्माने बॅटनेही इतके योगदान दिले नाही. याआधी तो फलंदाजीत खूप धावा करत असे. दोन वर्षांपूर्वी संघ दहाव्या क्रमांकावर होता. होय, हा संघ गेल्या वर्षी प्लेऑफसाठी पात्र ठरला होता, परंतु रोहितमध्ये यापूर्वी जो जोश दिसत होता तो गेल्या दोन वर्षांत दिसला नाही. सतत क्रिकेट खेळल्यामुळे तो थकला असण्याची शक्यता आहे.”
रोहित शर्माने 11 हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आणि 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. 2013 च्या मध्य हंगामात त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आणि तेव्हापासून गेल्या 11 हंगामात मुंबई इंडियन्सला नवीन उंचीवर नेणाऱ्या रोहित शर्माने मागे वळून पाहिले नाही. यामुळेच सीएसकेसह मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. (Gavaskar’s support for the decision to remove Rohit from the captaincy Said In the last two years he)
हेही वाचा
‘माझ्या मते तो कर्णधार बनण्याच्या…’, हार्दिक पंड्याविषयी माजी दिग्गजाचे खळबळजनक विधान
ब्रेकिंग! नवीन उल हकवर ‘या’ टी20 लीगमधून 20 महिन्यांची बंदी, नेमकं प्रकरण काय? लगेच वाचा