टी२० विश्वचषक २०२१ च्या साखळी फेरीच्या समाप्तीपूर्वी उपांत्य फेरीचे सामने आधीच ठरले आहेत. यावेळी तीन विश्वविजेते संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या यादीत गतविजेत्या वेस्ट इंडिजचाही समावेश आहे. वेस्ट इंडीज संघाने संपूर्ण स्पर्धेत अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. पिंच हिटर्सनी सजलेल्या कॅरेबियन संघाच्या खराब कामगिरीने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याचवेळी अनुभवी ख्रिस गेलही काही विशेष करू शकला नाही. दरम्यान, त्याच्याशी संबंधित काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्यानंतर त्याचे कौतुक होत आहे.
हा टी२० विश्वचषक वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल जो टी२० प्रकारातील सर्वात मोठा खेळाडू आणि युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखला जातो. स्पर्धेत त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. गेलला या स्पर्धेतील पाच सामन्यांमध्ये केवळ ४५ धावा करता आल्या. ही कामगिरी त्याच्या कर्तुत्वाशी अजिबात जुळत नाही. या खराब कामगिरीनंतर त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. मैदानावर उतरेपर्यंत गेल ज्या मानसिक स्थितीत होता आणि आनंदी दिसत होता, ते प्रत्येक खेळाडूला शक्य होणार नाही.
ख्रिस गेलचा खराब फॉर्म टी२० विश्वचषकातही पाठ सोडू शकला नाही. कारकीर्दच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेल्या गेलला टी२० विश्वचषकात १००० धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी होती, जी त्याने गमावली. त्याने असे केले असते, तर तो श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धनेनंतरचा दुसरा खेळाडू ठरला असता.
खरं तर, जेव्हा ख्रिस गेल देशासाठी विश्वचषक खेळण्यासाठी यूएईला पोहोचला, तेव्हा त्याचे ९१ वर्षीय वडील पहिल्याच सामन्यापासून आजारी होते. संपूर्ण विश्वचषकात तो आपल्या वडिलांपासून दूर राहून देशासाठी खेळत राहिला. आता विश्वचषकाच्या समाप्तीनंतर तो लगेच जमैकाला आपल्या वडिलांना भेटण्यासाठी पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषक विजेता खेळाडू म्हणतोय, ‘कोहली-शास्त्री युगाचा शेवटचा सामना जिंकून स्पर्धेचा शेवट करा’
जाता-जाता शास्त्री गुरूजींनी फोडला बॉम्ब! म्हणाले, “आयपीएलमूळे विश्वचषकात…”