---Advertisement---

‘तुम्ही मुर्खपणा करत असाल, तर तुमची सामना जिंकण्याचीही लायकी नाही,’ दिग्गजाची इंग्लंडवर जहरी टीका

On: बुधवार, ऑगस्ट 18, 2021 8:08 AM
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करत १५१ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने फलंदाजी सोबतच गोलंदाजीत देखील कमाल केली, ज्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला. भारताच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघाला टीकेला सामोरे जावे लागत आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा सामना इंग्लंडने गमावल्यानंतर, इंग्लंडचा माजी खेळाडू ज्योफ्री बॉयकॉटने देखील इंग्लंड संघाची आलोचना केली आहे. बॉयकॉटने इंग्लंडच्या खेळीवर आणि त्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

द टेलिग्राफच्या एका स्तंभात  बॉयकॉटने लिहिले, “दुसऱ्या सामन्याच्या पाचव्या दिवसाच्या सुरुवातीपर्यंत इंग्लंडचा संघ जिंकण्याचा प्रबळ दावेदार होता. तेव्हा भारतीय संघ या सामन्याला अनिर्णित ठेवण्याच्या तयारीत होता. मात्र जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या भागीदारीमुळे इंग्लंडच्या संघाला अडचण निर्माण झाली. ज्यामुळे, नंतर इंग्लंडला २७२ धावांचे लक्ष्य मिळाले. याच्या बदल्यात इंग्लंडचा संघ केवळ १२० धावांवर गारद झाला आणि ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ०-१ ने पिछाडीवर गेला. सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वाद झाला होता. भारतीय संघाने या परिस्थितीचा फायदा घेत चांगली खेळी केली जे इंग्लंडच्या संघाला जमले नाही.”

“या कसोटी सामन्यातून २ गोष्टी समोर येतात. पहिले म्हणजे, जर तुम्ही वेडे असाल तर तुम्ही कसोटी सामना जिंकण्याच्या लायकीचे नाही. जो रूटने त्याच्या फलंदाजीने प्रभावित केले. मात्र कर्णधार म्हणून आखलेल्या रणनीतीने तेवढेच निराश केले. दुसरे म्हणजे, इंग्लंडचा संघ नेहमी जो रूटच्या खेळीवर निर्भर राहू शकत नाही. आता इंग्लंडच्या सलामीच्या ३ फलंदाजांना त्यांच्यात लवकरात लवकर सुधारणा कराव्या लागतील,” असेही बॉयकॉटने लिहिले.

दरम्यान, एकावेळी भारतीय संघाचा डाव डगमगला होता. मात्र खालच्या फळीतील फलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी भारताच्या डावाला सावरले. त्यांनी ९ व्या विकेटसाठी ८९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ज्यामुळे इंग्लंडला २७२ धावांचे लक्ष्य मिळाले.

यावर बॉयकॉट म्हणाले, “जो रूटने कर्णधार म्हणून क्षेत्ररक्षणाची सजावट चांगली केली होती. मात्र जसप्रीत बुमराहला खेळताना पाहून, रूटने अशी प्रतिक्रिया दिली जसे पिसाळलेला बैल करतो. त्याने मार्क वूडला बुमराहसाठी शॉर्ट पिच गोलंदाजी करण्यास प्रोत्साहित केले. हे यामुळे घडले असावे कारण याआधी बुमराहने पहिल्या डावात जेम्स अँडरसन विरुद्ध बाउन्सर टाकले होते. याचा बदला घेण्यासाठीच रूटने असे केले असेल. त्यावेळी खेळाडूंमध्ये शाब्दिक वाद झाले. मात्र इंग्लंडचे गोलंदाज शमी-बुमराहला बाद करायचे सोडून. त्यांच्या शरीरावर गोलंदाजी करायला पाहत होते.”

तसेच बॉयकॉट भारताच्या या विजयाचे कौतुक करत म्हणाले, “शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडचा संघ विजयाच्या खूप जवळ होता. मात्र, इंग्लंडच्या खराब खेळीमुळे त्यांनी सामना गमावला. यावर माझा विश्वास बसत नाहीये. मात्र, भारतीय संघाने उत्कृष्ट खेळी करत हा सामना जिंकला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.”

महत्वाच्या बातम्या –
लॉर्ड्सवरील शानदार कामगिरीने प्रभावित झाले बीसीसीआय अध्यक्ष, ‘असे’ ट्विट करत दिली शाबासकी
भारताच्या ऐतिहासिक विजयाचे ६ नायक, ज्यांनी गाजवली लॉर्ड्स कसोटी
“इंग्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांना घाबरले”, सचिन तेंडूलकरची यजमानांवर जहरी टीका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---