आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाजांनी आपल्या करिकीर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेतल्या आहेत, परंतु तुम्हाला सर्वाधिक जलद 100 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचे नाव माहित आहे का? ज्याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ 18 कसोटी सामने खेळले आहेत. या गोलंदाजाने 128 वर्षांपूर्वी हा विश्वविक्रम केला होता, जो आजही कायम आहे. या बातमीद्वारे आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया.
सर्वात जलद 100 कसोटी विकेट्स घेण्याचा रेकाॅर्ड इंग्लंडचा माजी गोलंदाज जॉर्ज लोहमनच्या (George Lohmann) नावावर आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत केवळ 18 कसोटी सामने खेळले आणि 100 कसोटी विकेट्सचा आकडा गाठला. 1896 मध्ये खेळल्या गेलेल्या त्याच्या 16व्या कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली. सर्वात वेगवान 100 विकेट्स घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला. 128 वर्षे उलटून गेली पण आजपर्यंत लोहमनचा हा रेकाॅर्ड कोणीही मोडू शकले नाही.
सर्वात जलद 100 कसोटी विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची यादी-
16 सामने, जॉर्ज लोहमन (इंग्लंड) विरुद्ध दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग( 2 मार्च 1896)
17 सामने, चार्ल्स टर्नर (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड सिडनी (1 फेब्रुवारी 1895)
17 सामने, सिडनी बार्न्स (इंग्लंड) विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी (23 फेब्रुवारी 1912)
17 सामने, क्लेरी ग्रिमेट (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध वेस्ट इंडिज, ब्रिस्बेन, (16 जानेवारी 1931)
17 सामने, यासिर शाह (पाकिस्तान) विरुद्ध वेस्ट इंडिज दुबई (13 ऑक्टोबर 2016)
18 सामने, रविचंद्रन अश्विन (भारत) विरुद्ध वेस्ट इंडिज वानखेडे (14 नोव्हेंबर 2013)
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025 Retention Rules; रिटेंशन नियमात मोठे बदल, RTM कार्डचाही वापर होणार
ताशी 155 किमीच्या वेगाने चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाची भारतीय ताफ्यात एन्ट्री, गंभीरमुळे चमकलं नशीब!
फलंदाज त्रिफळाचीत होऊनही पंचांनी दिले नाबाद, क्रिकेटच्या नियमामुळे प्रतिस्पर्धी संघाची गोची!