आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. सध्या स्पर्धेची तयारी जोरात सुरू आहे. भारत आणि पाकिस्तान वगळता इतर सर्व संघांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा सर्वात प्रबळ दावेदार असलेल्या संघाला आणखी एक धक्का बसला आहे. तो संघ दुसरा कोणता नसून दक्षिण आफ्रिका आहे. या आयसीसी स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेने आधीच आपला संघ जाहीर केला आहे. ज्यात एनरिक नोर्कियाचा समावेश करण्यात आला. पण संघ जाहीर झाल्यानंतर तो जखमी झाला आणि आता तो या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. दरम्यान संघासमोर आणखी एक समस्या उभी राहिली आहे. जेराल्ड कोएत्झी देखील चॅम्पियन्स ट्रॉफी खेळू शकणार नाहीत अशी बातमी येत आहे.
दक्षिण आफ्रिकेचा सर्वात आक्रमक वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीचा चॅम्पियन्स ट्रॉफी संघात समावेश नव्हता. पण जेव्हा अँरिक नोर्किया जखमी झाला. तेव्हा असे म्हटले जात होते की जेराल्ड कोएत्झी हा गोलंदाज असा आहे जो त्याच्या जागी येऊ शकतो. याचा अर्थ असा की तो संघात सामील होण्यासाठी एक प्रबळ दावेदार मानला जात होता. पण आता त्यांच्या आशा धुळीस मिळाल्याचे दिसून येत आहे.
जेराल्ड कोएत्झी सध्या SA20 मध्ये प्रिटोरिया कॅपिटल्सकडून खेळत आहे. परंतु या स्पर्धेदरम्यान कोएत्झीला हॅमस्ट्रिंगच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचे उघड झाले. आता तो काही काळासाठी SA20 मधूनही बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत, कोएत्झी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकेल अशी शक्यता फारच कमी आहे. कारण आता चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास फक्त एक महिना शिल्लक आहे. तथापि, जेराल्ड कोएत्झीबद्दलची अपडेट अद्याप समोर आलेली नाही. मोठी गोष्ट म्हणजे कोएत्झी नुकताच त्याच्या जुन्या दुखापतीतून बरा झाला आहे. आता पुन्हा एकदा त्याला दुखापतीनं घेरले आहे. हे त्याच्यासाठी आणि संघासाठी अजिबात चांगले संकेत नाहीत.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी रिषभ पंतला मिळणार कर्णधारपद, या संघाचं नेतृत्व करणार
रणजी ट्रॉफीपूर्वी विराट कोहली दुखापतग्रस्त, महत्त्वाच्या सामन्यात खेळणार की नाही?
मनु भाकर- डी गुकेशसह चौघांना खेलरत्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिले क्रीडा पुरस्कार, VIDEO