सध्या युरोपमध्ये युरो कप २०२० ही फुटबॉल विश्वातील दुसरी सर्वात मोठी स्पर्धा सुरू असून, शुक्रवारपासून (२ जून) स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात झाली. या दरम्यानच स्पर्धेच्या अंतिम सोळा फेरीतून बाहेर पडलेल्या जर्मनीचा अनुभवी मध्यरक्षक टोनी क्रूस याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. २०१४ मध्ये जर्मनीने जिंकेलेल्या फुटबॉल विश्वचषकात त्याने निर्णायक भूमिका बजावली होती. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली असली तरी, आपण रिअल माद्रिदसाठी क्लब फुटबॉल खेळणे कायम ठेवणार असल्याचे त्याने म्हटले आहे.
जर्मनीसाठी खेळलो याचा अभिमान
जवळपास बारा वर्ष जर्मनीसाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेल्या ३१ वर्षीय क्रूस याने एका पॉडकास्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याने म्हटले, “मी खूप मोठा काळ अभिमानाने आणि आवडीने जर्मनीची जर्सी अंगावर चढवली. मी आत्तापर्यंत १०६ सामन्यात जर्मनीच्या प्रतिनिधित्व केले ते यापुढे करू शकणार नाही.”
— Toni Kroos (@ToniKroos) July 2, 2021
क्रूस पुढे म्हणाला,”युरो कपनंतर मी निवृत्त होण्याचे ठरविले होते. तसेच, २०२२ कतार येथे होणाऱ्या विश्वचषकासाठी देखील मी अनुपलब्ध असणार आहे याची कल्पना सर्वांना दिलेली. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झालो तरी, रिअल माद्रिदसाठी मी खेळणे सुरू ठेवणार आहे. तसेच काही वेळ कुटुंबाला देखील देता येईल.”
जर्मनीला युरो २०२० युरोच्या अंतिम सोळा सामन्यात इंग्लंडविरुद्ध २-० असा पराभव पत्करावा लागला. यासोबतच संघाचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक जो किम लो यांनी देखील आपला पदभार सोडला.
अशी राहिली कारकीर्द
क्रूस याने २०१० मध्ये जर्मनीसाठी आपला पहिला सामना खेळला. जर्मनीने २०१४ मध्ये ब्राझील येथे झालेला फिफा विश्वचषक जिंकला होता. त्या विश्वचषकातील प्रत्येक सामन्यातील सर्व मिनिटे क्रूस याने खेळली होती. यजमान ब्राझीलविरुद्ध उपांत्य सामन्यात त्याने दोन गोल झळकावलेले. क्रूसने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १०६ सामने खेळताना १७ गोल नोंदविले होते. क्लब फुटबॉलमध्ये तो २०१४ पासून रिअल माद्रिदचे प्रतिनिधित्व करतो. या संघासाठी खेळताना त्याने २०१५ सामन्यात १८ गोल केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
सानियाचे ‘ग्रँड कमबॅक’! विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत मिळवला विजय, मुलाने वाढविला उत्साह
जेव्हा वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला जगातील सर्वात कमजोर संघाने दाखवला होता चांगलाच इंगा
“मी अशा खेळाडूंच्या कानशिलात लगावली असती,” विश्वविजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया