मुंबई । आयसीसी टी 20 महिला विश्वचषकाच्या सात महिन्यांनंतर, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) बुधवारी प्रथमच महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळविण्यात आले. ऑस्ट्रियाने पाच टी 20 आंतरराष्ट्रीय मालिकेत जर्मनीचे यजमानपद भूषविले. पहिल्या सामन्यात जर्मनीने एकतर्फी विजय नोंदविला. ऑस्ट्रियाला 82 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
कोविड -19 च्या साथीमुळे सर्व महिला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने निलंबित झाले. पण आता कालपासून(12 ऑगस्ट) पुन्हा महिला क्रिकेटही सुरु झाले आहे.
काल झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जर्मनीने 20 षटकांत 2 बाद 165 धावा केल्या. ख्रिस्टीना गफने सर्वाधिक 72 आणि कर्णधार अनुराधाने नाबाद 40 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रियन संघ 83 धावांवर कोसळला.
ऑस्ट्रियाची फलंदाजी इतकी सुमार होती की, 10 खेळाडूंना 10 धावांचा आकडाही गाठता आला नाही. कर्णधार अँड्रिया झेपिडियाने 35 धावा फटकावल्या, बाकीचे सर्व खेळाडूंनी खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम केले. ऑस्ट्रियाच्या 83 धावांमध्ये 27 धावा अतिरिक्त होत्या.
जर्मनीने शेवटचा टी 20 आंतरराष्ट्रीय सामना ओमान विरुद्ध फेब्रुवारीमध्ये खेळला होता. वर्षभरापूर्वी ऑस्ट्रियन संघ फ्रान्स, जर्सी आणि नॉर्वे या चार देशांत झालेल्या चौरंगी मालिकेनंतर जर्मनीविरुद्ध खेळत आहे.
सुवर्ण ईगल्स म्हणून ओळखले जाणारे जर्मनी, आयसीसी महिला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत 27 व्या स्थानावर तर ऑस्ट्रिया 50 व्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काहीही होऊ द्या! या वर्षापर्यंत धोनीचं राहाणार सीएसकेचा कर्णधार
क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर मॅच खेळणारा आयपीएलमधील एकमेव संघ, कारण होते…
ऍडम गिलख्रिस्टने अखेर मान्य केलेच, भारताच्या ‘या’ दोघांनी आम्हाला फारच त्रास दिला
ट्रेंडिंग लेख –
सीपीएल २०२०: ४ परदेशी खेळाडू जे बनू शकतात सीपीएलच्या आठव्या हंगामाचे स्टार
२ वेळा विश्वचषकात संधी मिळूनही दुखापतीमुळे खेळू न शकलेली हरहुन्नरी पुणेकर देविका वैद्य
पुण्याच्या अनाथालयातील पोरगी, जीने ४ वेळा ऑस्ट्रेलियाला केले विश्वविजेते