---Advertisement---

‘दोघांना एका खोलीत आणा आणि…’, वॉर्नर-जॉन्सन वादात रिकी पाँटिंगची उडी

On: गुरूवार, डिसेंबर 7, 2023 7:42 PM
Johnson-Warner-And-Ponting
---Advertisement---

मिचेल जॉन्सन याने डेव्हिड वॉर्नर याच्यावर केलेलं वक्तव्य आठवडाभर ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये चर्चेत राहिलं. अजूनही यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सची एकापाठोपाठ एक विधाने समोर येत आहेत. यातच ताजे नाव आहे ते ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याचे. या दिग्गज खेळाडूने आता माध्यमांमध्ये हे प्रकरण पुढे येऊ नये यासाठी उपाय सुचवला आहे. त्याने वॉर्नर आणि जॉन्सनला एका खोलीत बसवून चर्चेद्वारे प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पॉन्टिंग ( Ricky Ponting) म्हणाला, ‘मला आता या दोन लोकांमध्ये यावे लागेल. या दोघांना एका खोलीत आणण्यासाठी मी मध्यस्थ असणे आवश्यक आहे असे दिसते. मीडियात हा मुद्दा उपस्थित करण्यापेक्षा दोघांनीही एकमेकांशी बोलून हा मुद्दा मिटवावा.

पाँटिंग पुढे म्हणाला, ‘हे दोघेही खूप संतापले आहेत आणि मला माहित आहे की, हे प्रकरण 6 ते 8 महिने जुने आहे. ऍशेस मालिकेसाठी निवडीच्या वेळी हा वाद सुरू झाला. हे असेच चालू राहिले कारण दोघेही समोरासमोर बसून त्यावर बोलले नाहीत. हे आता घडावे अशी माझी इच्छा आहे.”

डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 14 डिसेंबरपासून पाकिस्तानविरुद्ध सुरू होणारी तीन सामन्यांची मालिका ही त्याची शेवटची कसोटी मालिका आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिचेल जॉन्सन (Mitchell Johnson) याने वॉर्नरवर निशाणा साधला होता. तो म्हणाला होता की, सॅन्ड पेपर प्रकरणात दोषी ठरलेल्या वॉर्नरला सन्मान का मिळत आहे? जॉन्सन असेही म्हणाला होता की, खराब फॉर्म असूनही वॉर्नरला कसोटी संघात का स्थान देण्यात आले? जॉन्सनच्या या वक्तव्यानंतर हे प्रकरण अजून तापले आहे. (Get the two in a room and Ricky Ponting jumps into Warner-Johnson controversy)

महत्वाच्या बातम्या

इरफान पठाणकडून गौतम गंभीरचे समर्थन; पोस्ट करत म्हणाला, ‘हसणे हेच…’
BCCI आणि NCAने पंड्यासाठी बनवला 18 आठवड्यांचा खास प्लॅन, करतोय हार्ड वर्कआऊट; स्वत: शेअर केला Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---