ब्रिस्बेन। द गॅबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा कसोटी सामना सुरु आहे. हा ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आहे. शेवटच्या सामन्यापर्यंत भारतीय संघ दुखापतींनी बेजार झाला आहे. अशातच या सामन्यादरम्यान एका चाहतीने अनोखे पोस्टर झळकावले आहे.
झाले असे की सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रविवारी(१७ जानेवारी) भारताच्या डावादरम्यान फलंदाजी करत असलेल्या शार्दुल ठाकूरच्या हाताला चेंडू लागला. त्यामुळे अनेकांना अजून एक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त झाला की काय, असे वाटले. पण शार्दुलची दुखापत फार गंभीर नसल्याचे लक्षात आल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. याचदरम्यान स्टेडियममध्ये एका चाहतीने एक पोस्टर झळकावले. ज्यावर लिहिले होते की ‘गेल वेल सून टीम इंडिया’ अर्थात भारतीय संघाने लवकर बरे व्हावे.
खरंतर ऑस्ट्रेलिया दौरा सुरु झाल्यापासून जवळपास ११ ते १२ खेळाडूंना छोट्या मोठ्या दुखापती झाल्या आहेत. ज्यामुळे काही खेळाडूंना हा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले. तर काही जणांना काही सामन्यांना मुकावे लागले. त्यातच चालू असलेल्या ब्रिस्बेन कसोटी दरम्यानही नवदीप सैनी या वेगवान गोलंदाजाला मांडीमध्ये वेदना जाणवत असल्याने स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते.
भारतीय संघातील अशा दुखापतग्रस्त खेळाडूंना पाहूनच या चाहतीने असे अनोखे पोस्टर सामन्यावेळी झळकावले असू शकते. या चाहतीचा पोस्टर झळकावण्याचा फोटो क्रिकेट.कॉम.एयूच्या ट्विटर हँडेलवर शेअर करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे दुखापतींच्या मुख्य कारणामुळे ४ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताला तब्बल २० खेळाडू खेळवावे. यात विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, शुबमन गिल,हनुमा विहारी,आर अश्विन,रविंद्र जडेजा,वृद्धिमान साहा,रिषभ पंत, जसप्रीत बुमराह,मोहम्मद शमी, उमेश यादव,नवदीप सैनी. मोहम्मज सिराज,रोहित शर्मा,वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दुल ठाकूर या खेळाडूंचा समावेश आहे.
A blow to the glove for Shardul Thakur, but he's ok to continue #AUSvIND pic.twitter.com/i3aZagZPRO
— cricket.com.au (@cricketcomau) January 17, 2021
दुखापतींनी बेजार टीम इंडिया –
काही दिवसांपूर्वीच सिडनी येथे पार पडलेल्या कसोटी दरम्यान अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे ते आधीच ब्रिस्बेन कसोटी सामन्यातून बाहेर पडले. एवढेच नाही तर चालू ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विहारी, रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त होणारा पहिले भारतीय खेळाडू नाही. त्यांच्याआधी मोहम्मद शमी, उमेश यादव आणि केएल राहुल हे तिघेही दुखापतीमुळे या दौऱ्यातील कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहे.
शमीला पहिल्या कसोटीत, उमेशला दुसऱ्या कसोटीत दुखापत झाली. तर केएल राहुलला सरावादरम्यान दुखापत झाली. तसेच ब्रिस्बेन कसोटीआधी जसप्रीत बुमराहच्या ओटीपोटात ताण आल्याने आणि आर अश्विनला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने त्यांनाही या कसोटीतून बाहेर पडावे लागले.
तसेच इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार या दौऱ्याआधीच दुखापतग्रस्त असल्याने त्यांची भारतीय संघात निवड झाली नव्हती. त्याचबरोबर रोहित शर्मा देखील दुखापतीमुळे वनडे, टी२० मालिकेत आणि कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात खेळला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या –
दुर्दैवी! सांगलीत क्रिकेट खेळताना मैदानातच हृदयविकाराचा झटका आल्याने युवकाचा मृत्यू
SL vs ENG : पहिल्या कसोटीत इंग्लंडचा विजय दृष्टीक्षेपात, केवळ ३६ धावांची गरज
आत्तापर्यंत केवळ ३ भारतीय जोड्यांनाच जमलेला ‘तो’ विक्रम आता शार्दुल-सुंदरच्याही नावावर