बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉरचर्स विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स या सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. पर्थ स्कॉरचर्सचा फलंदाज एश्टन टर्नरने मारलेला चेंडू स्टेडियमच्या छताला लागल्याने त्याला सहा धावा मिळाल्या.
या लीगच्या नियमानुसार स्टेडियमच्या छताला चेंडू लागला तर सहा धावा दिल्या जातात. त्यामुळे टर्नर हा या नियमानुसार या सहा धावा मिळवणारा या हंगामातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
सामन्याच्या 12व्या षटकात ही घटना घडली. डॅनियल क्रिस्टयनने टाकलेल्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर टर्नरने मारलेला शॉट सरळ स्टेडियमच्या छताला लागला. हा चेंडू 30 यार्डच्या अंतरात पडल्याने पंचानी तो षटकार म्हणून निर्णय दिला.
Turner hits the ROOF 🤯🤯🤯
📺 Watch #BBL08 now on #FoxCricket pic.twitter.com/hTVT5CT9ay
— Fox Cricket (@FoxCricket) December 20, 2018
या सामन्याचे समालोचक माजी दिग्गज ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्न आणि ब्रेट ली यांनी आश्चर्य व्यक्त केले. सामन्यामध्ये हवामानाचा व्यत्यय येऊ नये म्हणून स्टेडियमला छत लावण्यात आले आहे.
स्टेडियमच्या कोणत्याही भागाला चेंडू लागला तर तो षटकार देण्यात येणार असा नियम 2014मध्ये ठरवण्यात आला. 2011च्या हंगामात अशी घटना घडली होती तर त्या चेंडूला डेड बॉल दिले होते.
टर्नर या सामन्यात जरी नशीबवान असला तरी त्याने या नियमाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
“तो डेड बॉल असला पाहिजे होता. तो चेंडू कुठेही जाऊ शकतो किंवा विरोधी संघ त्याचा झेलही घेऊ शकतो”, असे टर्नर म्हणाला.
या सामन्यात पर्थने प्रथम फलंदाजी करताना 19 षटकात 103 धावा केल्या. तर मेलबर्नने 15व्या षटकातच हे लक्ष्य पार करत सामना 4 विकेट्सने जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारताचे माजी सलामीवीर फलंदाज झाले भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक
–धोनीने रणजी ट्रॉफी खेळणे म्हणजे युवा खेळाडूची संधी हुकणे!
–युवराज सिंग या कारणामुळे आयपीएल २०१८मध्ये झाला होता अपयशी…