पुणे : जाएंटस ‘अ’ आणि घोरपडी तमिळ युनायटेड संघांनी यंदाच्या मोसमात द्वितीय श्रेणीत सुपट एट गटात अव्वल स्थान पटकावून पीडीएफएच्या पुढील वर्षासाठी प्रथम श्रेणीत स्थान मिळविले.
एसएसपीएमएस मैदानावर झालेल्या सामन्यात आज जाएंटस ला पराभव पत्करावा लागला, तर घोरपडी तमिळ युनायटेडने विजय मिळविला. जाएंटसला एफसी बेकडिन्हो संघाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला असला, तरी त्यांच्या गुणतक्त्यातील स्थानावर त्याचा काही परिणाम झाला नाही. घोरपडी तामिळ युनायटेडने डायनामाईट्सवर 2-0 असा सहज विजय मिळवून आपले प्रथम श्रेणीतील स्थान निश्चित केले.
एफसी बेकडिन्होने सौरभ पाटील (१३वे मिनिट) आणि जेम्स डिसूझा (६३वे मिनिट) यांच्या गोलमुळे जाएंटसच्या अपराजित राहण्याच्याा मालिकेला धक्का दिसला. जाएंटसकडून झुबिन सी (५७वे मिनिट) याने एकमेव गोल केला. गुणतक्त्यात एफसी बेकडिन्हो 10 गुणांसह टेबलवर तिसऱ्या स्थानावर आहे. सुपर 8 मध्ये त्यांचा पहिला पराभव होऊनही जाएंटस 14 गुणांसह आघाडीवर राहिले.
घोरपडी तामिळ युनायटेडने कार्तिक काली (24वे मिनिट ) आणि प्रभू भंडारी (३१वे मिनिट) यांनी केलेल्या गोलमुळे डायनामाईट्सविरुद्ध विजय मिळविला. त्यांचा सुपर ८ गटातील हा चौथा विजय होता. त्यांचेही १४ गुण झाले.
समान गुणांमुळे सरस गोल सरासरीच्या आधारे जाएंटस ‘अ संघाने अव्वल स्थान पटकावत द्वितीय श्रेणीतील विजेतेपद पटकावले. (जायंट्स +6 आणि घोरपडी तामिळ युनायटेड +2 ).
निकाल –
एसएसपीएमएस मैदान; द्वितीय विभाग, सुपर-8
न्यू इंडिया सॉकर: 3 (अभिषेक श्रीवास्तव 16वे,कीथ इव्हान्स 49वे, आशिष उभाळे 54वे मिनिट) वि.वि. राहुल एफए : 2 (आयुष वर्मा 25वे आणि २९वे मिनिट)
डेक्कन इलेव्हन ‘क’: 4 (प्रणव जगताप 11वे,मिहिर राठोड 21, 26 आणि 53वे मिनिट) वि.वि. उत्कर्ष क्रीडा मंच ‘ब’: 2 (चैतन्य कुलकर्णी, सुभाष लिगाडे 38वे)
घोरपडी तामिळ युनायटेड : 2 (कार्तिक काली 24वे, प्रभु भंडारी ३१वे) वि.वि. डायनामाइट्स : 0
एफसी बेकडिन्हो : 2 (सौरभ पाटील 13वे, जेम्स डिसूझा ६३वे मिनिट) वि.वि.जाएंटस अ : 1 (झुबिन सी 57वे मिनिट)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारत मालिका गमावणार? दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ खेळाडू चौथ्या टी२०मध्ये करू दमदार शकतो पुनरागमन
‘कर्णधार’ हार्दिक मैदानात उतरताच ६३ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची होणार पुनरावृत्ती, असेल पाचवा संघनायक
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी२० सामना होऊ शकतो रद्द? हे आहे मोठे कारण