आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारामध्ये जेव्हापासून टी२० क्रिकेटची एंट्री झाली आहे, तेव्हापासून चाहत्यांना मैदानावर जोरदार षटकार- चौकारांची बरसात पाहायला मिळू लागली आहे. क्रिकेटच्या या छोट्या प्रकारात मोठ्या धावसंख्या रचल्याचे आणि ते आव्हान पार केल्याचेही आपण पाहिले आहे. तसेच, अनेक विक्रम रचले गेलेत आणि मोडलेही गेलेत. असाच एक विक्रम आता आयसीसीचा असोसिएट असलेला आणि जवळपास ३३ हजार लोकसंख्या असलेल्या देशाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचला आहे. त्यांच्या सलामीवीर फलंदाजांनी आपली विकेट न गमावता पूर्ण २० षटके खेळून काढली आहेत. असा कारनामा करण्याची ही पहिली वेळ आहे.
युरोपात सध्या व्हॅलेटा कप (Valletta Cup) सुरू आहे. या टी२० स्पर्धेत जिब्राल्टर आणि बल्गेरिया (Gibraltar And Bulgaria) संघात झालेल्या सामन्यात जिब्राल्टरने इतिहास रचला. या सामन्यात जिब्राल्टर संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात कर्णधार बालाजी पाई (Balaji Pai) आणि लुईस ब्रूस (Louise Bruce) या सलामीवीरांनी संघाला एकही झटका लागू दिला नाही. या वेळी फलंदाजी करताना जिब्राल्टरने निर्धारित २० षटकात २१३ धावांचा महाकाय डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बल्गेरिया संघाला निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १९२ धावाच करता आल्या. त्यामुळे जिब्राल्टरने हा सामना आपल्या नावावर केला.
???????? Gibraltar's Louis Bruce and Avinash Pai put on 213* for the opening wicket against Bulgaria which is now the 4th highest opening stand in men's T20Is.
Interestingly, the duo also hold the 7th highest opening stand of 172 runs which came against the same opposition last year. pic.twitter.com/Gn195PQEvL
— European Cricket (@EuropeanCricket) May 13, 2022
यादरम्यान पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या जिब्राल्टर संघाकडून खेळताना कर्णधार बालाजीने ५९ चेंडूत नाबाद ८६ धावा चोपल्या. त्याने या धावा करताना १ षटकार आणि ११ चौकार चोपले. तसेच, लुईसने ६३ चेंडूत नाबाद ९९ धावा केल्या. या धावा करताना त्याला २ षटकार आणि ११ चौकारांचा साथ मिळाली. बल्गेरियाने जिब्राल्टर संघाच्या विकेट्स घेण्यासाठी आपल्या ८ गोलंदाजांना आजमावले. मात्र, त्यांना एकही विकेट घेता आली नाही.
LOUD AND PROUD… ???????? https://t.co/bVWgrQKTls pic.twitter.com/YCGFr0Ya15
— Gibraltar Cricket (@Gibraltar_Crick) May 13, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
बालाजीने घेतल्या २ विकेट्स
आव्हानाचा पाठलाग करताना बल्गेरियानेही चांगली सुरुवात केली होती. एकेवेळी संघाची धावसंख्या ८ षटकांनंतर १ विकेट गमावत ८७ धावा होती. मात्र, शेवटी संघ ६ विकेट्स गमावत १९२ धावाच करू शकला. यावेळी सॅम हुसेनने सर्वाधिक ६४ धावा चोपल्या. त्याने ३१ चेंडूचा सामना करताना २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ही धावसंख्या उभारली. यावेळी जिब्राल्टर संघाकडून गोलंदाजी करताना कर्णधार बालाजीने खास कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३८ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022। चेन्नईचा काटा काढल्यानंतर तिलक वर्माने मैदानातच कुणासाठी जोडले हात? घ्या जाणून
शर्माची जागा घेणार वर्मा? लवकरच ‘या’ खेळाडूच्या कपाळावर लागणार मुंबईच्या कर्णधारपदाचा ‘तिलक’