---Advertisement---

“गिल असा क्रिकेटपटू आहे ज्याची येणाऱ्या काळात भरपूर चर्चा होईल”, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी

On: बुधवार, फेब्रुवारी 3, 2021 3:11 PM
---Advertisement---

भारतीय संघात नुकतेच आपले स्थान निर्माण करणाऱ्या शुबमन गिल याचे सर्वच स्थरातून कौतुक केले जात आहे. अशातच आणखी एका दिग्गज भारतीय क्रिकेटपटूने गिल याचे कौतुक केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर -गावसकर ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉ याच्या जागी संघात स्थान मिळवणाऱ्या गिल याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध चांगली कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

गिलची ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध कामगिरी

गिल याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पदार्पण करताना पहिल्या ३ सामन्यातच सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने ३ सामन्यांच्या ६ सत्रात ५१.८० च्या सरासरीने २५९ धावा केल्या. यात चौथ्या सामन्यात विजय मिळवून देताना ९१ धावा केल्या होत्या.

शुबमन गिल असा क्रिकेटपटू बनेल ज्याची सर्वत्र चर्चा होईल – व्हीव्हीएस लक्ष्मण

गिल याचे कौतुक करताना लक्ष्मण म्हणाले,” माझ्या मते गिल असा क्रिकेटपटू आहे ज्याची येणाऱ्या काळात भरपूर चर्चा होणार आहे. फक्त कसोटी क्रिकेटच नव्हे तर क्रिकेटच्या तीनही प्रकारामध्ये तो नाव कमवेल, मी हे यामुळे बोलत आहे कारण तो कुठल्याही गोष्टीला हलक्यात नाही घेत” असे लक्ष्मण गिलबद्दल म्हणाले.

मोठ्या संधीसाठी गिल तयार – लक्ष्मण

पुढे ते म्हणाले, “शुबमन गिल याने भारतीय संघात येण्यासाठी धैर्याने वाट पहिली आहे. त्याने प्रत्येक प्रकारामध्ये धावा केल्या आहेत. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्याने जबदरस्त प्रदर्शन केले आहे. आयपीएल, भारत अ आणि पंजाब संघासाठी त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध कारकिर्दीची सुरुवात करताना जोश हेझलवूड, मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांसारख्या गोलंदाजांचा सामना करणे सोपे नसते. परंतु त्याने जबरदस्त सामना केला.”

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ गेममुळे बुमराहच्या समोर खेळण्यासाठी आला आत्मविश्वास, युवा ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा अजब खुलासा

पहिल्या कसोटीसाठी गंभीरने निवडला ११ जणांचा भारतीय संघ; पण हार्दिकसह या अनुभवी खेळाडूंना नाही दिले स्थान

आयपीएलमध्ये खेळताना रोहित शर्माच्या मानधनात कशी झाली वाढ? घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---