---Advertisement---

स्पेशल बड्डे! वाढदिवसाचं औचित्य साधून रिषभ पंतला गर्लफ्रेंडकडून भन्नाट गिफ्ट

rishabh-pants-girlfriend
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मंगळवारी (4 ऑक्टोबर) आपला 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. अल्पावधीत आपल्या शानदार खेळाने त्याने अनेक चाहते निर्माण केलेत. भारतीय संघाच्या नियमित सदस्यांपैकी एक असलेल्या पंतला सर्वजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतायेत. ‌‌त्याचवेळी त्याची गर्लफ्रेंड असलेल्या ईशा नेगीने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रिषभ जितका त्याच्या आक्रमक खेळासाठी चर्चेत असतो तितकेच त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत असते. त्याच्या वाढदिवसादिनी त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगीने इंस्टाग्रामवर रिषभच्या अनेक फोटोंचा व्हिडिओ तयार करत आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. तसेच तिने त्या फोटोसाठी ‘हॅपी बर्थडे माय लव्ह’ असे कॅप्शनही दिले आहे. रिषभ आणि ईशा मागील बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करतात. त्यांनी हे नाते सर्वांसमक्ष स्वीकारले देखील आहे. ईशाच्या वाढदिवसादिनीदेखील त्याने तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

https://instagram.com/stories/ishanegi_/2941067593436616875?utm_source=ig_story_item_share&igshid=MDJmNzVkMjY=

काही दिवसांपूर्वीच रिषभ त्याची पूर्वाश्रमीची तथाकथित गर्लफ्रेंड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्यासोबतच्या इंस्टाग्राम स्टोरी वॉरमुळे चर्चेत होता. दोघांनीदेखील अनेक टोमणे मारत एकमेकांवर नाव न घेता टिप्पणी केली होती.

आपल्या चार वर्षाच्या छोट्याशा कारकिर्दीत पंतने अनेक मोठ्या विजयांमध्ये आपले योगदान दिले आहे. 2020-2021 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर गावसकर सिरीजचा तो नायक होता. तसेच काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये देखील वनडे मालिका जिंकून देण्यात त्याने निर्णायक भूमिका बजावली होती. दोन आठवड्यांनी सुरू होणाऱ्या टी20  विश्वचषकासाठी देखील त्याची भारतीय संघात निवड झाली असून त्याच्याकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---