दक्षिण आफ्रिका संघाचे माजी दिग्गज जॉंटी रोड्स यांनी भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याचे तोंड भरून कौतुक केले आहे. अर्शदीपने टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी करत सहा सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट 7.80 होता. रोड्सच्या मते न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत देखील भारताने युवा खेळाडूंना प्राधान्याने संधी दिली पाहिजे.
एका कार्यक्रमात बोलताना जॉंटी रोड्स (Jonty Rhodes) यांनी अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि पाकिस्तानचे माजी दिग्गज वसीम अक्रम (Wasim Akram) यांची तुलान करणे टाळले. ते म्हणाले, “मला वाटते स्विंगचा सुलतान वसीम आक्रमसोबत तुलना केल्यानंतर अर्शदीप जास्तच दबावात येईल. त्याने मागच्या दोन वर्षांमध्ये नक्कीच चांगली सुधारणा केली आहे आणि भारताच्या इतर गोलंदाजांनीही असेच केले आहे. तुम्ही जसप्रीत बुमराहकडे पाहा. त्याने खूप झटपट प्रगती केली आहे. अर्शदीपनेही असेच केले आहे. तो अजून युवा आहे. त्याला शिकायचे आहे आणि आपण सांगितलेल्या गोष्टी ऐकण्यासाठी तो तयार असतो.”
“अर्शदीप चेंडू स्विंग करतो आणि शेवटच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजीही करतो. तो पावरप्लेमध्येही संघासाठी चांगली गोलंदाजी करतो. चेंडूवर त्याचे चांगले नियंत्रण आहे. तो वसीम अक्रमसारखी प्रभावशाली अराउंड द विकेट गोलंदाजी करू शकतो.” जॉंटी रोट्स आयपीएल फ्रेंचायझी पंजाब किंग्जसोबत क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम करत असताना अर्शदीपसोबत त्यांनी बराच वेळ घालवला आहे. असात ते भारताच्या या युवा गोलंदाजाला चांगले ओळखतात असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. रोट्सच्या मते सलग दोन टी-20 विश्वचषकांमध्ये निराशाजनक प्रदर्शन केल्यानंतर भारताने आता युवा खेळाडूंना संधी दिली पाहिजे.
न्यूझीलंडला गेलेला भारतीय संघ खूप युवा आहे आणि बीसीसीआयने अशाच खेळाडूंवर गुंतवणुक केली पाहिजे, असेही रोड्स पुढे बोलताना म्हणाला. दरम्यान न्यूझीलंडला गेलाला भारतीय संघ रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत शुबमन गिल, उमरान मलिक, इशान किशन आणि संजू सॅमसन या खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक पंड्या, तर एकदिवसीय मालिकेत शिखर धवन कर्णधारपदाची भूमिका पार पाडतील. (‘Give chance to young players in New Zealand tour’, former legend praises Arshdeep)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू खरा मुस्लीम नाही म्हणूनच…’, माजी दिग्गजाची मोहम्मद रिजवानवर घणाघाती टीका
सिक्स पॅक्स असावेत तर भारतीयांसारखे! समुद्रकिनारी दिसली हार्दिक पंड्या आणि कंपनी