महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंढे यांनी आज(8 डिसेंबर) मराठवाड्याच्या स्वतंत्र रणजी संघाची मागणी केली आहे.
ही मागणी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. तसेच यात म्हटले आहेत की ते यासाठी आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
“मराठवाड्यात अनेक उत्तम क्रिकेटपटू आहेत मात्र त्यांना वाव मिळत नाही, त्यासाठी मराठवाड्याचा स्वतंत्र रणजी संघ असण्याची गरज असून मराठवाड्यालाही स्वतंत्र रणजी संघाचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांकडे आग्रह धरणार आहोत.”, असा ट्विट धनंजय मुंढे यांनी केला आहे.
मराठवाड्यात अनेक उत्तम क्रिकेटपटू आहेत मात्र त्यांना वाव मिळत नाही, त्यासाठी मराठवाड्याचा स्वतंत्र रणजी संघ असण्याची गरज असून मराठवाड्यालाही स्वतंत्र रणजी संघाचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही आदरणीय @PawarSpeaks साहेबांकडे आग्रह धरणार आहोत.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 7, 2018
रणजीमध्ये सध्या महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबई असे तीन संघ खेळतात. मागील वर्षी रणजी ट्रॉफीचे विजेतेपदही विदर्भाने जिंकले आहे.
तसेच यावर्षी सध्या सुरु असेलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत 9 नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. यात ईशान्यकडील मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पाँडीचेरी, सिक्कीम हे सहा संघ आणि अरुणाचल प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड असे एकूण 9 नवीन संघांचा यात समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–२१ वर्षीय फलंदाजाने रणजी ट्राॅफीत असा काही कारनामा केली ज्याचा आपण फक्त विचारच केलेला बरा
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: तिसऱ्या दिवसाखेर भारताकडे १६६ धावांची आघाडी
–विराट कोहलीची कसोटीमध्ये या गोलंदाजाने केली आहे सर्वाधिक वेळा शिकार
–असा पराक्रम करणारा कोहली ठरला केवळ चौथा भारतीय