भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला असलेली धावांची भूक दिसून आली आहे. त्याला केवळ ३ महिन्यांचे प्रशिक्षण आणि काही रणजी सामने खेळायला मिळाले, तर तो भारतीय संघासाठी पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये धावा करू शकतो, असे त्यानेच बंगालचे वृत्तपत्र संवाद प्रतिदिनशी बोलताना म्हटले. तो आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या दिवसांबद्दल मुलाखत देत होता.
तो म्हणाला, जर मी आणखी २ वनडे मालिका खेळल्या असत्या, तर मी आणखी धावा केल्या असत्या. पुढे बोलताना तो म्हणाला, जर मी नागपूर कसोटीत निवृत्ती घेतली नसती, तर मी पुढच्या २ कसोटी मालिकेतही धावा कुटल्या असत्या.
“मला केवळ ६ महिने द्या आणि मला काही रणजी सामने खेळू द्या. मी भारतीय संघासाठी आताही धावा करून दाखवेल. मला ६ महिनेही नको केवळ ३ महिने द्या. मी धावा करेल,” असे गांगुली म्हणाला.
गांगुली (Sourav Ganguly) म्हणाला, “तुम्ही मला खेळण्याची संधी तर देऊ शकणार नाहीत. परंतु माझ्यामध्ये असणारा विश्वास कसा तोडाल?” तो पुढे म्हणाला, “मला वनडे क्रिकेटमधून अनौपचारिकरीत्या वगळले. मी २००७-०८ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फलंदाजांपैकी एक होतो. परंतु मला संघातून वगळण्यात आले.”
“जर तुमच्याकडून व्यासपीठच हिरावून घेतले, तर तुमच्या उत्कृष्ट कामगिरीला काहीही अर्थ राहत नाही. तुम्ही व्यासपीठाशिवाय काय सिद्ध करणार? आणि कोणाला सिद्ध करणार? अगदी हेच माझ्याबरोबर घडले,” असेही गांगुली म्हणाला.
गांगुलीने आपला शेवटचा वनडे सामना (ODI Match) २००७ साली ग्वाल्हेर येथे पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याने नोव्हेंबर २००८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या कसोटी मालिकेतनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना (Test Match) नागपूर येथे खेळला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भज्जी पाजी यावर्षी खेळणार करिअरमधील शेवटचे आयपीएल?
-धोनीवर लावला जातो या पाच खेळाडूंचे करियर संपविल्याचा आरोप
-सौरव गांगुली या ३ कारणांमुळे होऊ शकणार नाही आयसीसीचा पुढील अध्यक्ष






